Thursday, March 19, 2026

सिम्बा मोठा झाला

                                                               सिम्बा मोठा झाला 

आई ग, सिम्बा मोठा झाला..बघ सिम्बा मोठा झाला. बघता बघता..सिम्बा मोठा होतो. मी आणि माझी मुलगी 'लायन किंग' हा गाजलेला ऍनिमेशन चित्रपट बघता बघता मोठ्या झालो :) गम्मत म्हणजे सोफ्यावर बसून हा चित्रपट, हे गाणे, आमचे आवडते गाणे झाले..एकदम दिल से, टचिंग. ह्या गाण्याचे टायटल आहे, 'हकूना मटाटा'. आपला हा फ्युचर लायन किंग ऊर्फ सिम्बा एक सिंह असतो. आपल्या धर्माने. स्वधर्माने. पण तो लहानपणीच झालेल्या traumatic घटनांमधून वाचत वाचत तो एका अनोळखी प्रदेशात येतो. तेंव्हा तो लहान असतो. त्याला आपल्या स्वतःमधील पॉवर्स ची, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ही नसते, कोणी करून दिलेली ही नसते.  त्याला दुनियादारी माहित नसते, युद्ध माहित नसते, राज्य माहित नसतं, सीमारेषा माहित नसतात. राज्य कसे करायचे, शत्रू कसे असतात, कटू कारस्थानं माहित नसतात, त्याच्या डोळ्यांमध्ये लुकलुकणारी निरागसता वॉल्ट डिस्ने (मूव्हिस ) ने अतिशय अचूकपणे टिपलेली आहे. 

सिम्बा जेंव्हा आपल्या आई वडिलांपासून दुरावतो आणि ह्या अनोळखी प्रदेशात येतो तेंव्हा त्याला दोन जीवाभावाचे मित्र भेटतात. टिमॉन आणि पुम्बा. ते त्याला 'हकूना मटाटा' शिकवतात. त्याचा सांभाळ करतात. सिम्बा छोटा असतो. त्याला हे सगळे खूप छान वाटते. तो विचारतो मित्रांना 'हकूना मटाटा' म्हणजे काय? ते म्हणतात, "means no worries," "no trouble," or "take it easy". हा वाक्प्रचार मुळात स्वाहिली भाषेतला आहे. डिस्ने  टीम ने ही टर्म पहिल्यांदा केनियात ऐकली, आणि मग ती एल्टन जॉन च्या ह्या गाण्याचा स्वरूपात जगभर पोचली. It signifies a carefree, problem-free philosophy. किती छान ना, लहान पण देगा देवा म्हणतात अगदी तसं, पण सिम्बा एक जातीचाच राजा असूनही त्याला माहीतच नसल्यामुळे तो ही आरामात असतो. आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवत रानावनात त्याला कशाचीच फिकर नसते. 

असे इथे तिथे भटकंती करत करत सिम्बा आपला मनातल्या मनातलं carefree आयुष्य मनमुराद जगात असतो. ही सगळी कार्टून अथवा ऍनिमेशन characters आपल्याला इतका आपलंसं करतात की आपण त्याची स्टोरी जगायला लागतो. त्यांच्या शी आपला एक ऋणानुबंध जुळतो. आपणच आपल्याला त्या सिम्बा पुम्बा आणि टिमॉन मध्ये बघायला लागतो. कसे असते बुआ कॅरेफ्री आयुष्य? मला सिम्बा आवडत गेला आणि मी आणि माझी मुलगी असंख्य वेळा हे गाणे बघत बघा काहीतरी शिकत शिकत मोठ्या झालो. :) सगळ्यात गम्मत म्हणजे ह्या गाण्याच्या एका पॉईंट ला ब्रिज वरून जाताना सिम्बा छोट्याशा मोठा होतो. आधी जरा भाम्भावलेला जपून वागणारा, ह्या एका झाडाच्या खोडरूपी ब्रिज वरून चालता चालत एका स्टेप मध्ये मोठा होतो. आता हा सिनेमॅटिक अतिशयोक्ती अलंकार आहे आणि त्या वेळी माझी मुलगी दर वेळी गाणे बघताना म्हणत असे, अगं आई बघ. लुक. सिम्बा मोठा झाला. 

हा मोठा झालेला सिम्बा आणि लहानपणचा सिम्बा ह्यात फरक आहे.. तो आता कॉन्फिडन्ट झाला आहे. सरावला आहे ..आजूबाजूच्या कंफेर्ट्स मध्ये. पुम्बा आणि टिमॉन च्या जंगलातल्या वातावरणामध्ये जिथे आक्रमक किंवा युद्धभूमी सारखे काहीच घडत नाहीये. ते खातायत तेच तो खातोय, ते जगतायत तसेच तो जगतोय, आनंदाने, त्यांची philosophy आत्मसात करून.  एका सुंदर श्या निसर्गरम्य जंगलात. धबधब्यांच्या सान्निध्यात. 

बघता बघता सिम्बा मोठा होतो पण तरीही मनाने तो अजूनही मस्तकलंदर आहे आणि असलाच पाहिजे. त्याचा रुबाब एक नवीनच आहे. मोठा झाल्याबद्दल अभिमान आहे त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या मित्र कम गार्डियन्स च्या चेहऱ्यावरही. आपण एका संकटातून सिम्बा ला वाचवला आहे, निरपेक्षपणे प्रेम करून त्याला माणसात आणलं आहे आणि त्याच्याबरोबर जगणं जगलं ही आहे. 

But life happens. सिम्बा ला त्याची मैत्रीण भेटते. ती राज्यातली ख्याली खुशाली सांगते. सिम्बा चे आई बाबा देवाघरी घेल्यावर राज्यात मोठे अराजक माजले असते. अंदाधुंद आणि कोणीच करता राजा (किंवा राणी नाही). प्रजा दुखावली गेली आहे. दुष्काळ देखील पडला आहे आणि सगळ्याकन्हींचं सगळ्या प्रकारे वानवा..कोणीतरी हवं आहे तिथे म्हणजे तू, आणि शत्रूंची टोळी नाहीतर अजून नासधूस करेल. सिम्बा जागा होतो. त्याचे carefree life तिथे संपते. त्याला आपल्या आई बाबांची आठवत येते. त्यांची शिकवण आठवते. सिम्बा पुन्हा एकदा मोठा होतो! 

मला असे वाटत राहते की माझी मुलगी तिला ही मूवी इतकी आवडली तिला ह्या सगळ्यात सिम्बा च्या मोठा होण्याचे आकर्षण होते. त्याचा ध्यास होता. त्याचा जन्म झाल्यापासूनची सेलेब्रेशन्स नंतरचा टत्याला मिळालेले प्रेम, आई वडील आणि प्रजादेखील..आणि मग हकूना मटाटा आणि मग त्याचा triumphantly राज्य वाचवण्याकडचा प्रवास, शत्रूशी लढणे, असे सगळे आणि मग पुन्हा नवा राजा होणे. आणि मला असा वाटतं की मला सिम्बा लहानपणचा जगण्यामध्ये जास्त कुतूहल होते. अर्थात नंतरच्या मोठे होण्यामध्ये ही होते. मी आणि माझी मुलगी ह्या गाण्यात मोठ्या होत गेलो. 

मला नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून हातात की माझा सिम्बा आता मोठा झाला. माझी मुलगी जेंव्हा माझ्या हितासाठी माझ्या protection साठी माझ्या वतीने भांडली, माझ्या 'टोवॉर्ड्स' माझ्या सुरक्षिततेसाठी ..आणि म्हणाली..रडत..आई माझा जन्म तुला प्रोटेक्ट करायला झाला आहे तेंव्हा मला हसावं का रडावं कळलं नाही. रडलेच. आई मुलीचा नातं तसं आहेच क्लिष्ट. माझ्या मुळीतला सिम्बा खरा मोठा झाला असे मला वाटले.

अजूनही बरेच टप्पे येईल आपल्या आयुष्यात प्रसंग येतील जेंव्हा आपण असेच सिम्बा सारखे मोठे होत राहू. हो मीही. असे थोडीच आहे की आपण वयाने मोठे झालो म्हणजे मोठे व्हायचे थांबावे? त्याच कुतूहलाने जेंव्हा जेंव्हा आपण आपल्या स्वतःला 'conquer' करू, तेंव्हा तेंव्हा आपण मोठे होऊ. कसाही का असेना तो क्षण सोनेरी असतो. चंदेरी असतो. गुढी पाडव्याचा असतो. जेंव्हा आपणच आपली गुढी उभारतो, कधी सीमोल्लंघन करतो. कधी काहीच नाही करत. काहीच सेलेब्रेशन नसते पण तरीही सिम्बा 'privately' मोठा होत राहतो. Grow होत राहतो.  प्रत्येक वेळी त्याला आधारस्तंभ देखील लागत राहातात. आणि त्याच वेळी  मोठा होत असतानाच काही बदल त्यालाच प्रयत्न पूर्वक घडवून आणावे लागतात. 

हकूना मटाटा!

Saturday, April 12, 2025

काटा रुते कुणाला

 मध्यंतरी एक विचार मनात आला.. स्वतःशी खरं असताना . आणि तसे मी ते नेहेमीच असण्याचा प्रयत्न करत आले आहे. पण काही वेळा आपण आपल्याशी प्रकर्षाने खरे असतो.

विचार आला विजेसारखा, मला एकाकी वाटतंय. त्या वेळी. मला खरोखरच एकाकी वाटतंय. फार सुंदर शब्द आहे ना? एकाकीपणा. एकटेपणा. एक जाणीव ज्या मध्ये आपल्याला अचानक लक्षात येतं की आपण एकटे आहोत. एकटे आलो ह्या जगात आणि एकटे जाणार ही, ह्या जगातून निघून.  हे झालं
निर्वस्त्र सत्य.. एकटे असणे .. म्हणजे अगदीच मूलभूत असं सत्य . की ज्यात कोणताही माणूस प्राणी पक्षी झाडे वेली फुलं, ग्रह तारे सूर्यमाला आणि त्याही पलीकडे एक अनंत अशी पोकळी.. एका निसर्गाच्या वर्तुळाप्रमाणे येणार आणि जाणार. अनादी अनंत कोटी वर्षे हेच चालू आहे आणि त्या सत्याचा आवाका देखील मोठा आहे म्हणजे व्याप्ती ..म्हणजे अगदी खगोलशास्त्रामध्ये देखील.. लांब लांब दिसणारे लुकलुकणारे तारे (का ग्रह?) हे देखील असंख्य खळबळजनक  घडामोडींमधून जात असतात आणि एकटेच असतात. ते 'जिवंत असणाऱ्यांमध्ये' नसतील देखील पण तेही एकटेच लुकलुकत असतात. कधी कोणी दुसऱ्याचा प्रकाश घेतो कधी स्वतःचाच. पण ह्या सगळ्याच्या पाळामुळाशी गेलो तर हे खरेच आहे की आपण एकटे असतो.

कठीण आहे मानायला, झेपायला, पण तेवढेच कटू सत्य देखील. मग हा एकाकीपणा नक्की काय असतो? त्यात दुःख असतं का? तर हो. आपल्याला त्या वेळी तरी वाटतं कि आपण एकटे पडलोय आपल्या साथीला कोणी नाही...आपल्याला समजून घेणारं असं मैतर कोणी नाही .. वगैरे वगैरे असंख्य विचार दाटून येतात मनात आणि त्त्यांना दुजोरा द्यायला ही एक भावना एखाद्या लाटेसारखी बेभान येते.. एकाकीपणा ..

ह्याच लाटेला एक आल्हाददायक आणि आश्वासक ओहोटी आणणारा, दुसरा विचार किंवा भावना म्हणजे स्वमग्न असण्याची. ज्यात मग आपल्याबरोबर आपले आप्तेष्ट असतीलही. नसतीलही. त्यातही आपण एकटे असू शकतो पण तेंव्हा ही भावना खूप सुखकारक असते. एकाकीपणासारखी दुःखी नसते. आपण आपल्यात रमलेलो असतो. स्वमग्न असणं ..म्हणजे खुद में मुशगूल रेहेना..

पण एकाकीपणा आणि स्वमग्न असणं ह्यातली सीमारेषा फार धूसर आहे असे ही माझ्या लक्षात आले. आपण आव आणू शकतो की स्वमग्न आहोत आपण स्वतःमध्ये आनंदी आहोत, बेहोष आहोत..स्वतःमध्ये सामावलेले आहोत..पण तो कदाचित आतून एकाकीपणा असेल, स्वतःला मान्य न करणारा ?

खरं सांगायचं तर एकाकीपणा हा मान्यताप्राप्त नाहीच आहे. म्हणजे त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाहीये :) म्हणूनच तर कोणीही बिचकेल .. ऐकून. किंवा बरेच से जणं स्वतःच मान्य करत नसल्यामुळे इतर कोणाचा एकाकीपणा  ही मान्यच करू शकत नाहीत.. माझ्यातली सकारात्मक मी नेहेमीच सांगते मला, की हे तात्पुरतं आहे.  एकाकीपणाची लाट येते, तशीच मनाला भरून येण्याची लाट देखील येते च की..

असे हृदयस्पर्शी  क्षण ही येत असतात. आपल्या माणसांबरोबर सहज पणे भेटताना, कोणताही मुखवटा न घालून.. भरती च तर येत असते.. स्वानंदाची ओहोटी ही काही वाईट नसते..जरी वरकरणी स्वानंदी माणूस disinterested वाटला दिसला तरी तो स्वमग्न अस
तो .. तीरावरच्या सुख दुःखांची तमा त्याला नसते .. एखादा फकीर असतो ना तसं . किंवा संत कबीरांचे दोहे असतात तसं .. तो गाणं म्हणत असतो.. ऐकणाऱ्यांना आवडो नआवडो.. like करो वा न करो :)

तर हे सगळे भावनांचे खेळ ..म्हणूनच तर ह्यातल्या सीमारेषा धूसर आहेत. मी स्वमग्न आहे
वेगळं आणि मला कधी तरी एकाकी वाटतं हे वेगळं . तेही खरं हेही खरं . त्या येणाऱ्या लाटा ही खऱ्या आणि जाणाऱ्या ही खऱ्या.. किनाऱ्यावर आदळणार्या देखील खऱ्या आणि निर्मनुष्य आणि गहिऱ्या अशा खोल महासागरात अस्पष्ट दिसणाऱ्या लाटा ही खऱ्याच.  सगळे लाटांचे आणि भावनांचे मायाजाल..

हे सगळं लिहिता लिहिता मला आता एकदम लक्षात आलं की मला समुद्र, लाटा का आवडतात..:)  कारण आपलं मन म्हणजे एखाद्या अनंत पसरलेल्या समुद्रासारखंच असतं..लाटा वेचायला गेलो तर हातात काहीच लागणार नाही. एकाकी काय, स्वानंद काय, प्रेम काय जिव्हाळा काय, राग काय लोभ काय.. कित्येकदा आपण ह्या सगळ्यांना शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयन्त करत असतो. कवी, कलाकार तर अजूनच जास्त .. पण बऱ्याचदा हे भाव फुलपाखरासारखे बघता बघता हवेत उडून जातात किंवा एखाद्या माशासाखी डुबकी मारून नाहीसे होतात.

तसे म्हंटलं तर प्रत्येकाला च साथ हवी असते ..समांतर विचार करणारी माणसं हवी असतात. समांतर ? समान नाही. कारण कोणीच एकसमान नसतं .. प्रत्येकालाच आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. प्रेम द्यायला व्यक्ती हवी असते. मग त्यात सगळ्या range मधले प्रेम हवं असतं, प्रेम द्यायचं ही असतं  .. मग मैत्री असो प्रियकार प्रेयसी असो, नाती  असोत, आपल्याबरोबर काम करणारी माणसं असोत , समाजाचा घटक म्हणून बरोबरची माणसं असोत, ओळखीची असोत किंवा अनोळखी असोत. माणूस तसा समूह्प्रीय प्राणी आहे आणि म्हणूनच त्याला एकटेपणा देखील आहे :) पु ल म्हणतात तसं ..एक शून्य मी पुस्तक मध्ये . कधीतरी माणसात असूनही किंवा नसूनही एकाकी पणा  जाणवू शकतो किंवा जाणवतोच.. आपण जबरदस्तीने त्या भावनेला पुरून टाकून म्हणतो किंवा म्हणायचं प्रयत्न करतो की आपण स्वमग्न आहोत.. solitude मध्ये आहोत... पण अगदी खरं म्हणजे ते वरकरणी असतं.  त्यावेळी तरी.

ह्या ही भावना खऱ्या आहेत त्याही खऱ्या.. आणि मग आपण हे ज्या क्षणी मान्य केलं, accept केलं, त्याच क्षणी आपण स्वतंत्र होतो. कोणापासून? स्वतःपासून..A true lib moment. सगळेच भाव मान्य करत जगणं .. मग तो एकाकी पणा ही का असेना? ..

ते भाव प्रामाणिक पणे आधी स्वतःशी मान्य करणं आणि मग जमल्यास आपल्या  व्यक्तींपर्यंत पोचवणं ..

 म्हणजेच जगणं ..काटा रुते कुणाला.. मज फूल ही रुतावे ..
 


Sunday, March 23, 2025

माझे बॅगी जीवन

जरुरत है जरुरत है... सख्त जरुरत है ..:) हे हिंदीत गाणे आठवत असेल तुम्हाला? त्यात त्या हिरो ला एका शिरीमती ची , कलावती ची गरज असते. आणि हो, 'सेवा करे जो पती की'ची  ची पण. :) असते आपली आपली गरज एकेकाची. तुम्ही म्हणाल आता ह्याचा बॅगेशी काय संबंध? सरळ  विषयावर का येत नाहीये ही? तर नाही मला आवडत सरळ विषयावर यायला कधी कधी. माझी मर्जी? :) असो, विनोदाला बाजूला राहूंदेत, ऊर्फ,  jokes apart !

मी एका सुंदरशा बॅगेच्या शोधात होते. ती अशी असेल, ती  तशी असेल, ती कशी असेल ? देखणी असेल का? कलावती असेल का ? सर्वगुणसंपन्न असेल का? उपयुक्त असेल का? टिकाऊ असेल का? हलकी फुलकी असेल का? हवेशीर असेल का? वगैरे कित्येक प्रश्न. माझी एकंदरीत प्रवासाची आवड, केलेले असंख्य प्रवास तेही वेगवेगळ्या माध्यमातून, कधी आवडीने कधी सवडीने, कधी घाईने तर कधी गर्दीने. कधी स्वदेशात तर कधी परदेशात आपले मानून राहताना ..केलेला प्रवास आणि त्यातल्या बॅगा .. आणि कधी नाईलाजाने करायला लागलेला प्रवास..  

कित्येक वेळा परदेशात राहत असताना, जास्त करून US मध्ये, असंख्य बॅग वाहतुकीतून झालेली कधी कधी ची माझी बिकट अवस्था .. वीस वीस किलोच्या दोन मोठ्या मोठ्या बॅगा नेताना . त्यांच्याकडे हताश होऊन बघताना की आपल्याला हे सगळे वजन पेलवणार आहे का? कधी मोठे धिप्पाड पोर्टर्स, माझ्याकडे काम मागत असूनही त्यांच्याशी काय बोलायचे काम कसे सांगायचे माहित नसल्यामुळे झालेली अडचण. स्वतःच स्वतःच्या बॅगा वाहण्याचा केलेला अट्टाहास आणि त्या बॅगांमधून मांडलेला, नेलेला आणलेला संसार..म्हणजे अगदी शब्दशः नाही तर संसार म्हणजे सगळंच, त्याबरोबर निर्माण केलेला यत्र तत्र चा फाफट पसारा देखील..     

ह्या सगळ्यातून मी खूप काही शिकले. एक महत्वाचे ते म्हणजे आपल्याकडे काहीही असो नसो, एक छान बॅग मात्र पाहिजे. :) आपले पुलं म्हणायचे 'माझे पौष्टिक जीवन', तर मला म्हणायचे आहे 'माझे बॅगी जीवन' आणि त्या भिंगातून आता बघत असताना मला दिसलेली, दिसत असलेली एक  वेगळीच दुनिया.

तर नुकतीच मला माझी कलावती सापडली. :) जिच्या मी शोधात होते. जिसे ढुंढती  हूँ  मैं हर कही..करत करत..एक सुंदर ओशन ब्लू कलर. हलकी फुलकी. खूप कप्पे. व्हील्स मस्त. केबिन बॅग. expandable. म्हणजेच वाढीव जागा असेलेली.  मी खूप खूष झाले. वाटलं हीच ती बॅग. हसीं हजारो भी हो खड़े मगर उसी पर नजर पड़े, तशीच. आणि एकदम झरझर  करत वर्षामागून वर्षे गेली..

अनेक आठवणी बॅगांमध्ये दडलेल्या आठवल्या.  कधी मी स्वतः भरलेल्या तर कधी माझ्या बरोबरच्या आप्तस्वकीयांनी, सहप्रवाशांनी भरलेल्या..असंख्य विमानाच्या बॅगेच्या पट्ट्या आठवल्या आणि त्यावरून सरकत सरकत जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवाशांच्या वेगवेगळ्या आकाराच्या, आणि रंगांच्या बॅगा आठवल्या.. त्यांची आतुरतेने वाट बघणारी माणसे आठवली. माणसे, जी कुठेतरी जाणारी कुठेतरी येणारी.  कधी बॅग आली नाही विमानाच्या पट्ट्यावरून तर आपल्या जिवाभावाच्या माणसांएवढीच जवळीक साधणारी ही त्यांची बॅग.. आलीच नाही तर? कुठे गेली असेल? कशी असेल? कहां है तू? कैसी है तू? म्हणत म्हणत जीवाचे रान करणारी माणसं ही बघितली आहेत मी..  

कधी घर गाठू बघणाऱ्या कदाचित प्रवाश्यांसारख्याच बॅगा ही असतील? दमलेल्या, भागलेल्या , आतुरलेल्या..  त्यांनाही त्यांची मनोगते असतील का? कधी शाळेत मनोगते लिहायला यायची. त्यात बॅग मात्र कधी नव्हती.  असे मनोगत लिहायला आले असते तरी देखील जे अनुभवातून लिहिले जाते तेच खरे मनोगत नाही का? कदाचित हे विधान पूर्ण खरे नसेल ही. कधी काल्पनिक गोष्टीही खऱ्याच असतात. पण काहीही असो, आता माझ्या ह्या बॅग 'rewinding' मध्ये मला असंख्य गमती जमती, सुखे आणि दुःखे , हसू आणि आसू दिसायला लागली..

गम्मत म्हणजे बॅगा सुद्धा इतक्या विविध आकार आणि ऊकारांमध्ये येतात की बस्स. छोटी मोठी,  केबिन चेक इन ह्याव आणि त्य्याव. काही रग्गेड काही नाजूक. काही लॅपटॉप साठीच्या तर काही अजून काही. काही corporate तर काही casual. काही भरमसाठ वस्तू राहतील अशा काही आटोपशीर. काही ना असे लॉक तर काहींना तसे लॉक. आजकाल अजून एक बॅग समूह निर्माण झाला आहे तो म्हणजे ट्रॅव्हल कंपनी केसरी वीणा SOTC इत्यादींच्या ब्रँड वाल्या बॅगा. म्हणजे कोणी वाटसरू चुकले माकले तर त्यांचा तपास करायला बरे. मग एकदा ती ट्रिप संपली तरी मग त्याच बॅगा  इतस्ततः  प्रवास करताना दिसतात त्याच आधीच्या तिकिटावर.. :) कित्येक वेळा तर अशा सारख्या सारख्या वाटणाऱ्या बॅगा बघून वाटायला लागतं की हे सगळे बॅगांचे देखील विश्वरूपदर्शन आहे की काय? सगळे सेम, तुम्ही आम्ही सगळेच. अहं ब्रम्हास्मि :) आणि मला ह्या सगळ्या अहं ब्रह्मास्मि तूनच बाहेर पडायचे होते. :) कृष्ण अर्जुनाला काय म्हणाला? तर तू तुझ्यासारखा वाग. स्वधर्म पाळ. तेंव्हाच तुला ह्या सगळ्या बॅगवतींमधून स्वतःची बॅग ओळखण्याचे सामर्थ्य मिळेल.

तर coming back to the airport. जरुरत है गाण्यामध्ये हिरो पुढचं म्हणतो, "तो साथ में आस्मा चले".. विमानतळ ही अशी जागा आहे तिथे बॅग ह्या entity ला अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे बॅगेलाही  लागते जर एक्सट्रा वजन भरलं तर. सगळं गणित विमानाच्या thermodynamics वरती अवलंबून असतं. त्यात भावनांच्या भरात वाहवून नेण्यासारखं ही नसतं काही आणि तसं केलं तरी त्याला एक विशीष्ट किंमत मोजावी लागते. सिडनी विमानतळावर एका आजी आजोबांना अडवल्याचं ऐकलं होता सामान जास्त झा
लं म्हणून; तर त्यांनी तिथे विमानतळावर बसूनच बॅगेतले सगळे रवा बेसन लाडू संपवले म्हणे लाडूंना न्याय द्यायला.  आपली मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्याच्याशी निगडित 'Law of Conservation of Energy'  :) त्यांनी किती लाडू खाल्ले आणि त्यांच्या तब्येतीचे पुढे काय झाले ते कोणालाच पुढे कळले नाही. बॅग हलकी झाली एवढे मात्र निश्चित. 
 
तर अशा संख्या बॅगा अडी अडचणीतून मार्ग काढत, कधी बेदरकारपणे भिरकावून दिल्या जात असतील, कधी काळजीपूर्वक हाताळल्या जात असतील, सगळे करत करत शेवटी दाटीवाटीने विमानाच्या सामानाच्या अवाढव्य कप्प्यात बसत असतील? कधी धास्तावून तर कधी निडरपणे?


ह्या सर्व rewinding मध्ये सगळ्यात धमाल प्रश्न म्हणजे खरोखरच प्रवासात  सामान किती ठेवावे? माझा एक अमेरिकन colleague मला म्हणाला होता की 'there is nothing as beautiful as a little child packing a bag for a trip'. मलाही गम्मत वाटली एकदम. का असेल ? एक म्हणजे लहान मुलांना बॅग भरायला सांगितली की त्यांना वाटतं अक्खा आणि हवं  ते सगळंच नेता येईल. मग ते ज्या पद्धतीने हव्या त्या वस्तू घेतील त्यात कदाचित आपलयाला म्हणजे मोठ्यांना महत्वाचं वाटेल च  असे ही नाही पण ते जे काही घेतील ते फार निरागस असेल. मी स्वप्नामधून बाहेर आले.

माझी एक मैत्रीण वारी ला जायला म्हणून आली होती माझ्याकडे. आम्ही दोघी मग गेलो होतो. तिने माझ्याकडे येताना एका दिवसासाठी च पण एक खूप जड आणि मोठी भरलेली अशी बॅग आली होती.. मी आणि ती  बोललो देखील ह्याबद्दल..हळूहळू बोलताना लक्षात आलं कि खरंच तिने आणलेलं सगळंच सामान तिला लागणारं होतं..आम्हाला कळत होतं आम्ही ज्ञानेश्वर तुकारामाच्या वारी ला जातोय तिथे जाताना रितं होऊन जायचंय किंवा रितं व्हायला जायचंय पण तरीही त्या आधी मात्र आम्हाला काही ना काही हवं होतं ... 

ह्या सगळ्यात एक मात्र लक्षात आले बॅग म्हणजे एक 'limited space'. एवढेच नेऊ शकतो आपण. काहीतरी सोडून द्यावे लागते. काहीतरी 'drop' करावे लागते. काही तरी जड कमी करावे लागते. कारण ते पुढे जाऊन आपल्याला पेलवणार नसते. काहीतरी ठरवावे लागते. अनावश्यक काय आणि आवश्यक काय. काहीतरी  तारतम्य बाळगावे लागते.. तरच आपण खरे प्रवासी होऊ शकतो.. light weight travelers..

वस्तूंच्या पलीकडे जाऊन कदाचित मला दवबिंदू pack करायला आवडतील. कदाचित गवताची थोडी पावसाने भिजलेली पाती देखील ठेवायला आवडतील. काही रानफुले कदाचित? कदाचित एखाद्या जाताना लागलेल्या देवळातले तीर्थ? भरधाव वेगाने जाणारा वारा? थोडा समुद्र ? थोडी त्याला कुठून कुठून काय काय करत येऊन मिळालेली नदी? थोडंसं चिमण्या पाखरांनी काड्या मुड्या जमवत जमवत बांधलेलं घरटं? थोडीशी वाळू? थोडेसे निसर्ग परतीच्या काहीही अपेक्षा न करता,
पल्याला जे काही अचाट अनुभवायला देतो, ते सगळे, त्यातले अनेकविध चमत्कार?  

विचार करा तुम्हाला प्रवासाला निघायचे आहे, घरातले किंवा तिथे असाल तिथले सगळे सामान हवे आहे, सगळ्या खोल्यांमध्ये जड अवजड , बरेच काही .. तुम्हाला ५ मिनटं दिल्येत. काय काय पॅक कराल ह्या तुमच्या बॅगे मध्ये? जागा सीमित आहे. खरं तर वेळ ही सीमित आहे..
  

Saturday, March 15, 2025

अश्रूंची झाली फुले

 काहीतरी कशातरी नव्याने परिवर्तित होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मला ह्या अशा वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मशन्स बद्दल फार आतमीयता आणि कुतूहल वाटत आले आहे. एखादी गोष्ट आधी वेगळ्या फॉर्म मध्ये असते मग नंतर ती आपोआप कालावकाश फॉर्म बदलते. अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक अतिशय सुंदर आणि भावणारी गोष्ट म्हणजे अश्रूंची फुले होणे. खरे तर दोघांचा काही डायरेक्ट संबंध नाही. पण खूपश्या कविता आणि गोष्टींमध्ये अश्रूंची फुले होणे हे वाचनात येत गेले आहे. मग म्हणजे होते काय? 

अश्रू खरं तर जास्त करून दुःख व्यक्त करतात... काहीतरी साचलेले असते मनात हे अश्रूंच्या माध्यमातून बाहेर येते.. ते एक कारण बनते निमित्त मात्र. साचलेले काहीतरी वेगळेच असू शकते पण त्याच वेळी ते व्यक्त होणे देखील महत्वाचे असते. अश्रूंना जर धरण घालून खूप जास्त किंवा कृत्रिमरीत्या रोखून धरले तर तेही मनासाठी चांगले नसते. वाटले, रडले व्यक्त झाले पुढे गेलो इतक्या सहजतेने रडणे झाले तर तसेच हसणे ही होऊ शकते असे मला वाटते. मी असे कित्येकदा बघते की जे खूप प्रयत्नपूर्वक अश्रू बंदिस्त करून ठेवतात त्यांना नंतर नंतर अथवा हळूहळू हसणेही कठीण जायला लागते.. 

म्हणजेच भावनांना अध्याहृत धरू नये.. हसू आणि आसू कदाचित शेजारी शेजारीच राहात असतील? आणि अश्रू देखील कधी दुःखाचे कधी आनंदचे देखील असतातच की? ह्या सगळ्यात अश्रूंची झाले फुले हा एक मेटॅमॉर्फोसिस आहे. म्हणजेच ते सुरवंट जसे खूप स्टेप्स मधून मोठे होत अचानक एके दिवशी सुंदरसे फुलपाखरू बनून उडून जाते तसेच अश्रू देखील कधीतरी रडत रडत अचानक एके दिवस सुंदर से हास्य बनतात तर कधी एक सुंदर शी अभिव्यक्ती बनतात तर कधी एखादे सुंदर से गाणे बनतात तर अशी कोणतीही कलाकृती बनतात...आणि दरवेळीच कलाकृती कशाला हवी? कदाचित एखादी छोटीशी मोकळे पण दिलेली दाद बनतात.. ज्या ज्या गोष्टींमध्ये मोकळे पणा आहे, सौंदर्य आहे ते बनतात आणि त्यांनाच कदाचित फुले म्हणत असतील?? 

Wednesday, March 12, 2025

काटकसर हवीच पण कंजूषपणा नको

माझ्या शाळेत आल्याआल्या विंग मध्ये खूप छान छान सुविचार लिहिलेले असत. अगदी शाळेतल्या वर्गात सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला रोज एक नवीन छान विचार उर्फ सुविचार लिहायला सांगितला जात असे. तेंव्हापासूनच हा रोज एक सुविचार मनावर लिहिला जात असे, खडूने. हे सगळे इतके ऑरगॅनिक होते, की अजूनही मी quotes च्या शोधात असते.. 

"काटकसर हवीच पण कंजूषपणा नको". हा एक त्यातलाच एक कोट.  घरीही ह्या कोट ला साजेसेच वातावरण होते. म्हणजे अगदी त्यातल्या त्यात काटकसरीकडे झुकणारे जास्तच. काटकसर होतीच, पैसे ही फारसे नव्हते, होते ते व्यवस्थित खर्च व्हायचे, वाचवत वाचवत, सगळेच जुळून यायचे. त्यात आम्ही ही आहे त्यात खुश होतो. साधी राहाणी हे मूळ तत्व उर्फ value foundation होते. मग काटकसरीची सुरवातच भाजी बाजारापासून व्हायची. आई किंवा बाबा भाजी माफक दरात मिळेल तिथून आणायचे मग त्या साठी थोडे जास्तीचे कष्ट घेतले तरी चालतील. किंवा खरं तर कष्ट हाच धर्म होता. तो आम्ही बघितला अनुभवला आणि कधी question करावासा वाटला नाही. शाळेतली, मित्र मैत्रिणींची, नातेवाइकांबरोबरची  सेलेब्रेशन्स देखील तशी साधीच असायची हो त्यातही काटकसर ला मूलभूत घटक किंवा अगदी आयुष्याचा 'महत्तम सामायिक घटक' उर्फ मसावि होता म्हंटलं तरी हरकत नाही. 

उन्हाळा  सुरु झाला कि शाळेत अगदी ह्या quote ला साजेसे सेलेब्रेशन व्हायचे. कैरीची डाळ, पन्हे आणि कलिंगड  'क प क' सेलेब्रेशन म्हंटले तरी चालेल. अगदी आजच्या काळातल्या A B C  ज्यूस सारखे. :)

मग पुन्हा एकदा त्या काळात डुबकी मारून हे बघावे म्हंटले तर वाटते की फक्त काटकसर च होती का? का कंजूषपणा देखील होता? तर नाही. घरी सगळे गोड  धोड पदार्थ बनायचे, विकत आणायचो.  कपड्यांची थोडी फार चैन होती,  प्रवासाची आवड असल्याने रिकरिंग अकाउंट चालू करून आई बाबा पैसे वाचवायचे आणि आम्ही जमेल तसे फिरतही असू . इन फॅक्ट मला प्रवासवर्णन लिहायची किंवा काहीतरी लिहायची आवड ह्या च काळात निर्माण झाली. म्हणलं तर सुट्टीत पिक्चर बघणे, नाटक बघणे गाण्याचे प्रोग्रॅम्स बघणे जास्त करून मूड्स ऑफ रफी हा, किंवा अगदी मराठीतला गीत रामायण देखील. कधी पुढचा रो कधी थोडा मागचा किती खर्च करायचा त्यावरून विचार केला जात ही असेल. पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वानंद शोधायला स्वातंत्य्र देखील मिळत असे. :) 

कधी वाटतं स्वानंदाची काही किंमत असते का? फार नसेल किंवा बिलियन डॉलर च्या ही पलीकडे असेल? एखादा फकीर आनंदी असतो तशी?  तर काहीही असो , आपण तो आपण मिळवला पाहिजे, आपल्या जवळच्यांना वाटला ही पाहिजे..खर तर..तेच होत ही असे! आनंद द्विगुणित किंवा त्रिगुणित होणे हे सगळे ह्यातून विनासायास घडत असे. 

आनंदाचा भागाकार होण्याची करणे देखील फारशी नव्हती. सो निखळ आनंद जास्त वाटत असे आणि तो पैशाने विकत घेता येत ही नसे :) 

म्हणजे पैसे महत्वाचे नाहीत का? होते तर. पण आहे ते थोडे फार  काटकसरीने राहून, पण कंजूषपणे न राहता जमून जात असे. 

ह्या सगळ्या ला आता अनेक पर्व  उलटली. अजूनही काही गोष्टी मूल्ये तशीच आहेत. बघितलं  तर आता काळाच्या ओघात पैसे ही आले, राहणीमान आले, luxuries आल्या. गाड्या आल्या , घोडे आले (ते नाही आले पण आपला असच लिहिला :)). गॅजेट्स आली. प्रवास आले. अजूनही चालू. सगळं सगळं च quantitatively वाढत गेलं , सुधारलं. काटकसर कमी झाली. कंजूषपणा नव्हताच पण कुठेतरी सगळ्या  मुल्यांचा मेळ जमेनासा झाला . म्हणजे वास्तविक पाहता मूल्ये तीच राहिल्येत. पण त्यांची आजच्या काळातली आकडेमोड थोडी गडबडली. आज खूप जणांकडे लॅव्हिश घरे आहेत, बऱ्याचशा मटेरिअलिस्टिक गोष्टी ही आहेत. काटकसर नावाचे ते नाटकातले पात्र कुठेतरी माळ्यावर निघून गेल्यासारखे वाटते. वारेमाप पैसे मोजले जातात एखाद्या इन्स्टंट आनंदा साठी, एखाद्या मोठ्या इव्हेंट साठी, किंवा असेच काहीतरी. हे सगळे आजूबाजूला चाललेले दिसते .. पण मला वाटतं हे सगळे transformation किंवा परिवर्तन आपण रोखू शकत नाही आणि रोखू ही नये. पण त्यावर घोड्यावर आरूढ होतो तसे आरूढ व्हावे. 

म्हणजे काय,..? तर कदाचित त्याच values आहेत..  एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीतील खर्चाचा आवाका बघावा देखील पण बिनधास्त मग खर्च ही करावा. वस्तू मधून आनंद मिळत नसला तरी हेही अर्धसत्य आहे. आजच्या काळात लागणाऱ्या काही गोष्टींवर काळाची गरज म्हणून नक्कीच खर्च केला पाहिजे.  वोह जिंदगी ही क्या जिस में हम पैसे सिर्फ एक बक्से में राखे? या दिल कि सुनो दुनियावलो? दिल की आवाज भी सुन? .. काटकसर हवीच पण इतकीही नको की आपण पैसे असूनही ते खर्च कसे कशावर करावेत हेही विसरून जाऊ. म्हणतात ना penny wise pound foolish बानू.  किंवा पैसे असूनही अकबर  बादशाह सारखे वागूनही काय मजा त्यात? बूंद से गइ वोह फीर हौद से नही आती ? 

सगळ्यांनाच अकबरासारखा बिरबल भेटत नाही.. आपल्यालाच आपलेच बिरबल व्हावे लागेल. एक बिनधास्त दिलदार आयुष्य जगायला .. आणि तेही अगदी 'बुंदे' वालं नाही.. 'हौद' वालं ही नाही.. कुठेतरी त्यांच्या सीमा रेषेवर? व्हॉट से ?

Thursday, November 14, 2024

जीन्स चे वजन

असा कधी भन्नाट विचार तुमच्या मनात आला आहे का? कि जीन्स चे वजन करून बघू? किंवा गूगल सर्च करून बघू की, आपल्या (आपापल्या) जीन्स चे सरासरी वजन किती असते? खरं तर असले वेडे प्रकार कशाला? :)


डाएट व्यायाम आणि नुट्रीशन हे माझे आवडते टॉपिकस असले, आणि मी जरी ऋजुता दिवेकर चे व्हिडिओस आणि तिचे करीना कपूर बरोबरच्या मुलाखती बघितल्या असतील तरी देखील स्वतःचे च वजन करतो ना आपण? जीन्स चे वजन? 


तर असे आहे की नुकतेच मला दोन एक महिन्यानंतर वजन करण्याचा चान्स मिळाला. :) मी खुश झाले. डॉक्टर कडे गेले होते रेगुलर अल्ट्रासाऊंड टेस्ट्स साठी, म्हंटलं विचारुयात, वजन काटा आहे का. तर चक्क होता. :) दोन महिने गेले होते मध्ये म्हणूनच एक प्रकारची धडधड, किती असेल वजन? :) ह्याला म्हणतात speculation :) मधल्या कालावधीत दिवाळी येऊन गेली होती, माझा वाढदिवस मग वेगवेगळे गोड  पदार्थ खाणे आणि माझ्या रेफेरिंग डॉक्टर चा सल्ला न मानणे  वगैरे वगैरे. तरीही एक मन सांगत होतं की वजन तेवढेच असेल जेवढे लास्ट टाइम दोन महिन्यांपूर्वी केले. आणि हो मी थोडीच दर दिवशी वजन करते? तशी मी  एकदम नॉर्मल आहे. अधून मधून जाता येता वजन करावे, सारखे सारखे गरज नाही. असे माझे मत आहे. 


पण तरीही मी मनोमन घाबरले होते. आणि व्हायचे तेच झाले, वजन जास्त आले माझ्या अपेक्षेपेक्षा. एवढे रोज दोन दोन तास चालून देखील? एक मन डाफरलं माझ्यावर. दुसरं मन म्हणालं  की हे शक्यच नाहीये. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या दुःखांचं  खरं  मूळ असतं  ते म्हणजे non-acceptance. मग आपण करणे शोधायला लागतो. आणि मग मला थोडा फार प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्यानंतर लक्षात हुशारीने लगेच लक्षात आला ते म्हणजे जीन्स चे वजन. :)


गूगल सर्च. प्रॉम्प्ट इंजिनीरिंग. लगेच मी मला हवी ती query बनवली. :) मला हवं  ते उत्तर मिळालं . की एका एव्हरेज जीन्स चे वजन सरासरी २ ते ३ किलो असतं. हलक्या म्हणजे चांगल्या  प्रतीची जीन्स असेल तर १ ते २ किलो. :) मग मी उत्तरांचा अवरेज काढला. २ किलो. माझ्या वजनातील त्रुटी मला लगेच कळली. :) 


मग मी खुश होऊन रेफेरिंग  डॉक्टर कडे गेले रिपोर्ट दाखवायला. तिचायकडे लागोपाठ करावं लागलं तरी वजन करणे सेरेमोनी होतोच तिथे. हे  मी विसरलेच  होते कि एका दिवसात एक दोन तासातच दोन ठिकाणी वजने होतील. मग मला वाटलं गुरुत्वाकर्षण. तिकडचे गुरुत्वाकर्षण आणि इकडचे ह्यात काही फरक असेल का? आणि हो मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणचे गुरुत्वाकर्षण देखील वेगळे असू शकते. विज्ञान शिकल्याचे दुष्परिणाम. :) तर खैर, ही डॉक्टर तर माझी एकदम आवडती आहे. तिच्याकडे तर गेल्या ८ वर्षांचा माझा वजनाचा रेकॉर्ड ही असतो, ऋजुता दिवेकर कडे करीनाचा असेल तसा. नाही मला कोणत्याखी प्रकारे झीरो फिगर मेन्टेन करण्यात इंटरेस्ट नाहीये, ऑफ कोर्से. हम सिर्फ इतना चाहते हैं  के हम अपनी  मेंटल फिसिकल हेलथ का ठीक से खयाल रखे. 


तर मला ह्या माझ्या आवडत्या डॉक्टर ने डायरेक्ट तिचा ८ वर्षांचा डेटा ऍनालीटीकस दाखवल्यावर मी मान्य केलं  स्वतःशी. Acceptance ! जीन्स चे वजन इस नॉट द कलप्रिट. आय एम रिस्पॉन्सिबल :)


ह्यापुढे ही असे आणि असंख्य वेडे विचार मनात येतील, पण माझा एकच सल्ला असेल (विचारला नाही तरी), जीन्स चे वजन करायला जाऊ नका. GPT वापरायचाच असेल तर जास्त सत्कारणी लागेल अशा ठिकाणी वापरा :)

Tuesday, November 12, 2024

एक बार वक्त से लम्हा गिरा कही

काही गाणी आपल्या रोमारोमात किती भिनलेली असतातत ना? तसेच हे गुलझार चे 'आनेवाले पल जानेवाला है'. मूवी तर धमाल च होती -गोल माल. खरोखरच गोल माल आणि खूप सारे गोंधळ त्यातून निर्माण झालेले नाट्य त्यात अमोल पालेकर चा डबल रोल. तरीही मुव्ही कदाचित मी परत परत बघणार नाही, हे गाणे मात्र परत परत ऐकेन त्यातल्या अर्थावर विचार करेन, आणि तसेच जगायचं देखील कदाचित प्रयत्न ही करेन. 

त्यातलीच एक लाईन. एक बार वक्त से लम्हा गिरा कही... वहा दास्तान मिली .. ह्यातले अतिशय सुंदर मर्म म्हणजे, वक्त आणि लम्हा ह्यातला मेळ. वक्त म्हणजे अनादी अनंत असा 'मैं  समय हुन'. महाभारतातला धीरगंभीर आवाज.. सिरीयल सुरूच ह्या वाक्याने व्हायची. म्हणजेच मॅथेमॅटिकस च्या भाषेत इंफायनाईट टाइमलाईन. जिला सुरवात नाही जिला शेवट नाही. नाव आहे चाललेली काल ही अन आज ही.. 

हा सगळं वक्त चा स्पॅन ..त्यातनं एक लम्हा म्हणजे नक्की काय ? तर एक छोटासा बिंदू.. तोच लमहा जेंव्हा टाइमलाईन पासून निखळून पडतो.. तेंव्हा मागे वळून माघितलं त्या जागी काय मिळतं? तर लम्हा काही नही. तिकडे फक्त एक दास्तां उर्फ कहानी, एक वर्णन मिळतं ..एक स्टोरी मिळते.. आपल्याला हवी  तशी बनवलेली. पण ती तो मोमेन्ट म्हणून कधीच परत येत नाही. चांगला असो वा  वाईट वा त्यातला मधलाच काहीतरी. neutral. 

पण मग सगळं खेळ हा 'पल दो पल' का आहे .. आनेवाला पल..भी.. जानेवाला है.. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो ...पल ये जो जानेवाला है.. तेही गुलझार म्हणतोय की हो साके तो..पण का आग्रह धरत नाहीये? कारण अट्टाहास केला तरी तो लम्हा अजून निसटून जाऊ शकतो.. दास्तां बनत बनत..

मग त्या एका छोट्याशा इवल्याशा क्षणांमध्ये आपण आपल्याला झोकून देऊ शकतो का? हो सके तो? 

Monday, November 11, 2024

माझी बर्ट्रांड रसेल म्युसेली

हे काय? बर्ट्रांड रसेल म्युसेली ? बर्ट्रांड रसेल हा तर ब्रिटिश फिलॉसॉफर होऊन गेला ना ? मग त्याचा म्युसेली शी काय संबंध? संबंध असा की बर्षर आणि बर्ट्रांड ह्यांच्या उच्चरातले साम्य. खरं तर ह्या रेसिपी चे नाव आहे बर्षर म्युसेली! माझी अतिशय आवडती ब्रेकफास्ट डिश. पहिल्यांदा मी आणि माझा नवरा आम्ही  ऑस्ट्रेलिया त असताना खाल्ली. मस्त बनवली होती त्या होमस्टे च्या ओनर ने. त्यानंतर असेच कित्येक वर्ष कुठे काही ट्रॅव्हल असेल तर ही डिश मी आवर्जून घेत असे हॉटेल मधल्या ब्रेकफास्ट मध्ये. म्हणजे अगदी उडी मारून घेत असेल असं म्हंटलं तरी चालेल. 

माझे खाद्यपदार्थांमधले रिव्हर्स इंजिनीरिंग तेंव्हा एवढे जागरूक नव्हते. म्हणजे मी फार विचार करत नसे, खायला मिळालं आहे ना, त्याची कृतज्ञता व्यक्त करून मी खात असे. म्हणजे बेताने च हं, हावरटासारखे नाही, पण मन लावून वगैरे. 

कमिंग बॅक तो म्युसेली, एकतर नावच एवढे कठीण आहे उच्चारायला. त्यात बर्षर म्युसेली. आपली मराठी नावे बघा, उपमा, पोहे. छोटे छोटे साधे शब्द. हे बर्ट्रांड रसेल सारख्या तज्ज्ञ लोकांमुळे किंवा बर्षर म्युसेली सारखी कठीण कठीण नावे ठेवणाऱ्या अज्ञात माणसांमुळे सोप्या गोष्टी कठीण होतात. नाही का?

पण मी ठरवलं बर्षर म्युसेली बनवायचीच, जेंव्हा माझ्या नुकत्याच केलेल्या बोर्निओ ट्रिप मध्ये मला खूप ठिकाणी ही डिश खायला मिळाली. एक नवीन मत्रीण झाली ट्रिप मध्ये, ती  म्हणाली मी ही रोज करते. मी भितीयुक्त आदराने तिच्याकडे बघितले. ती म्हणाली ही 'नॉन-कूकिंग' रेसिपी आहे. मला अजूनच गोंधळायला झाले. म्हंटलं सांग पुढे. व्हर्जिन अँपल ज्युस घायचा, रोल्ड ओट्स घ्यायचे मग ते रात्री १० तास अँपल ज्युस मध्ये भिजवायचे मग त्यात योगर्ट, वगैरे वगैरे... मला चक्कर यायला लागली. एक एक त्यातला इन्ग्रेडियंट खास कुठून कुठून आणायचा होता. साधा सुद्धा नव्हता. मग मीही ठरवले, बीइंग डाय हार्ड ऑप्टिमिस्ट,  आता मी माघार घेऊच शकत नाही. बर्ट्रांड रसेल म्युसेली बनवायचीच. कितीही कठीण असली तरी. 

मग जंग जंग पछाडत, मग रोलिंग स्टोन सारखे गोल उड्या मारत म्हंटले तरी चालेल, कोणी  रोल्ड ओट्स देता का रोल्ड ओट्स असे विचारात दुकानं च्या दुकानं फिरले. काही दुकानदार तर माझ्याकडे कोहिनूर हिरा आहे का विचारल्या सारख्या अविर्भावात बघत आश्चर्यचकित झालेले दिसले. मग काहींनी नॉन रोल्ड ओट्स दिले. जे मी नाकारले. मग finally होकारले सुद्धा कारण म्हणजे बघुयात तरी. तेही गणित चुकले. मग एका शुभ मुहूर्तावर मला रोल्ड ओट्स मिळाले. भिजवलं एकदाचं  त्यांना. मधल्या वेळात मग व्हर्जिन अँपल ज्युस शोधला. तोही कठीणच होता मिळायला. :) मग तिने मला सांगितले बॉक्स वर काय बघायचे मग ऑथेंटिक व्हर्जिन अँपल ज्युस मिळतो. तोपर्यंत मग कसे बसे एक्सपायरी डेट न गेलेले योगर्ट मिळवले. असे करत करत मी ही जे के रोलिंग सारखी हॅरी पोट्टर ची लेखिका ऑलमोस्ट झाले. जे के रोलिंग सारखेच माझ्याकडेही कॉन्ट्रॅक्ट नव्हते तेंव्हा हातात. :)

आता फक्त राहिले ते एक शेवटचे काम ते म्हणजे हे सगळे नीट पणे मिक्स करणे. त्यात खजूर आणि काही फळे तुकडे करून घातले. . जमली बाबा एकदाची- बर्षर म्युसेली. आयुष्याबद्दल खूप काही शिकवून गेली मला ही रेसिपी. :) हुश्श्य . पण आतापर्यंत माझ्यातली मिनिमलिस्ट आता जागी झाली होती. इनफ इस इनफ. 

हीच रेसिपी आपण सोपी करू शकतो का? मग मी धडाधड त्यातले सोप्पे मार्ग शोधले, बाहेरून गोष्टी न आणता घरच्या घरी आपण कसे सगळे बनवू शकतो, तीच टेस्ट आणून? सगळे आत्मसात केले मग मला finally चांगली झोप लागली. शिवाय रोल्ड ओट्स १० तास भिजवून ठेवावे लागत नाही ह्याचा ही मूलभूत रिसर्च मी केला. त्याचा soaking time ३० मिनिटांवर आणून मी प्रोसेस ऑप्टिमाइझ सुद्धा केली. :) मी आता होममेड बर्षर म्युसेली  एक्स्पर्ट झाले आहे. झोपेतही पेपर घाला. मी पास होईन. :) आणि हो बर्ट्रांड रसेल फिलॉसफया सारखी ती  कठीण राहिली नाही, नाऊ आय प्रौडली से  आय कॅन मेक बर्षर म्युसेली :) 

Sunday, November 10, 2024

नर तुम झुठे जनम गवाया

 मध्यंतरी एक संत कबीर यांचा दोहा ऐकलं 'नर तुम झुठे'  जनम  गवाया झुठे का कोई अंत न पाया'. त्या गाण्याची चाल सुद्धा सुंदर लावली होती. एक प्रकारचे मुसिकल पण त्यातून काहीतरी philosophical. कधीकधी किंवा बऱ्याचदा डायरेक्ट ना सांगता एखाद्या माध्यमातून सांगितले गेले तर ते जास्त चांगल्या रीतीने मनामध्ये पोचते, नाही का? उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीतून किंवा संगीतातून किंवा किंवा एखाद्या रोल प्ले मधून. तर हे अशा असंख्य गाण्यांपैकी एक गाणे जे मनाला भिडले त्याचा अर्थ चाल आणि त्यातील उत्कटता ह्या सगळ्यामुळे. ह्यांनी जे गाणे मला इंट्रोड्युस केले त्यांनी आधीच सांगितले होते ह्या झूम कॉल मध्ये (म्हणजे ग्रुप वर) कि हे गाणे झेपायला थोडे कठीण आहे. तर बी रेडी फॉर हार्ष ट्रुथस. 

कबीर के उत्तर भारतातील एक संत कवी होऊन गेले. त्यांनी अशीच जात येता गाणी रचली ह्यात लोकांना अर्थ काळात गेला. जसे महाराष्ट्रातील संत कवी तुकाराम होते. नर तुम  झुठे मध्ये कव्हर म्हणाले की सगळेच म्हणजे नॉट जस्ट मेन बट एनी ह्यूमन बीइंग, माणूस हा प्राणी एकंदरीत च खूप खोटे आयुष्य जगतो. म्हणजे खरा तर उभा जन्म खोट्या मध्ये राहतो, illusion अथवा भासामध्ये की हेच खरे आहे. हा खोटेपणा इतका माणसात भिनत जातो की त्याला अंत राहत नाही... एक खोटा दुसऱ्या खोट्याकडे जातो, खोटे खोटे खातो, खोटे खोटे समाजात वावरतो एक मुखवटा पांघरून , इतकेच नाही तर अगदी जवळच्या नाते  संबंधांमधून सुद्धा तो खोटे पणाचे लेअर घालून शिताफीने वागतो.. कळत नकळत , मग खोटा दुल्हा खोटी दुल्हन मग खोटा संसार ह्या सगळ्यात रमून जात बालके सुद्धा खोटी म्हणूनच अशीच वाढतात वागतात .. हे मर्म .. 

हे सगळे ऐकायला ही धक्कास्पद वाटत जाते आपल्याला.. अरे आपण तर खोटे नाही आहोत, आपण खरे बोलतो मग काही जण आपल्याला खरे खुरे खोटे बोलत असतात हे ही आपल्याला माहित असतं .. पण आपण तरी खरे असतोच असतो .. मग हे सगळे चालले काय आहे? आखा जमा खोटा आणि व्यर्थ घालवतो माणूस हे असे कबीर का म्हणत आहेत किंवा असतील?

मग एक गम्मत शीर पणे हे सगळे कोडे शेवटच्या ओळींमध्ये सॉल्व्ह होते. ते म्हणजे शेवटच्या लाईन मध्ये ते म्हणतात , मी खरा खरा सांगतो की जो  स्वतःमध्ये सामावून जातो किंवा गेलेला असतो (म्हणजे स्वार्थी नव्हे), तो खरे खुरे जगतो. स्वतः शी  'touch' मध्ये असतो, जो (किंवा जी) स्वतः मध्ये growth शोधतो, आणि ते करता करता जगतो सगळ्यांबरोबर अर्थात.. तो खरा जगतो. म्हणजे जो 'अपने में ही समाया' असतो तो खरा जगण्याच्या जवळ जाऊ शकतो.. 

आता जे मी आधी म्हंटल्याप्रमाणे खरंच कठीण आहे. पचवायला किंवा डायजेस्ट करायला. पण तरीही कबीर म्हणतात कि हेच सत्य आहे हेच सांचे आहे. आता हे सगळे साधे सुधे पण भेदक सत्य समोर आणणे एका खूप सुंदर गाण्यातून ह्या दोन्ही प्रख्यात गायिकांनी (रंजनी आणि गायत्री)  म्हंटले आहे. थोडे क्लासिकल आहे पण मला मुसिकल म्हणून मला आवडत गेले आणि त्यातले 'झुठे' मधली गम्मत कळली तर आपल्यालाही नक्कीच काहीतरी नवा अर्थ सापडेल..

माझा भाऊ musician आहे, आम्ही मुसिक कंम्पोसिशन्स बद्दल बोलताना  एक मला तो म्हणाला, जे  मला पटले आणि आवडले, ते म्हणजे मुसिक म्हणजे विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे असतात. एखादा प्रश्न मग थोडे उत्तर मग हीच शृंखला.. धिस  इस मुसिक..धिस  इस लाईफ टू देन ?

Saturday, November 9, 2024

तुम्हाला काय व्हायचंय?

कोणाच्याही स्वयंपाकघरात घुसून एखादी गोष्ट शोधणे किंवा त्याही पलीकडे जाऊन एखादी गोष्ट किंवा आयटम बनवणे ही एक अत्यंत कठीण कला आहे असे मला वाटते. शिवाय अत्यंत आत्मविश्वास ही लागतो त्याला. जो माझ्यात नाही आहे असे म्हंटले तरी चालेल अथवा मला माझा  आत्मविश्वास इतर जागी वापरायला जास्त आवडतो. उदाहरणार्थ कामात. 

ह्याचा अर्थ मला कोणाच्या ही किचन मध्ये जायला जमतच नाही असे नाही पण गम्मत अशी आहे की, उदाहरणार्थ माझी आई फ्रिज टॉप टू  बॉटम नियोजित करत  असेल तर मी बॉटम टु टॉप. मी जर भाज्या फ्रिज च्या खालच्या कप्प्यात ठेवत असें तर आई वरच्या. मी जर गोष्टी  झाकून ठेवत असें फ्रिज मध्ये तर आई उघडे. कोणी चमचे उलटे ठेवत असेल तर कोणी सुलटे. 

सगळ्यात जास्त धाडसी गोष्ट म्हणजे कोणाच्याही फोडणीच्या भांडत बघणे. (including mine). कोणाचे फोडणीचे भांडे गबाळे तर कोणाचे अजून गबाळे. कोणाचे कमीत कमी लेव्हल ला सगळे मसाले आलेले तर कोणी ओतप्रोत भरून एकमेकांच्या लाईन ऑफ कंट्रोल मध्ये घुसणारे. 

एक ना धड भराभर चिंध्या. तर अशा विविध पद्धतीने नटलेली असंख्य किचन्स. मग तुम्ही म्हणाल कि कशाला वेळ येत्ये असे अचानक किचन मध्ये जाऊन कोणाकडेही धुंडाळायला? हल्ली तसे बघितले तर कमी च येते अशी वेळ पण तरीही जेंव्हा येते तेंव्हा मी बघितले आहे कि काही जण किचन फिगर आउटिंग गरुडासारखे फार कमी वेळात आणि शिताफीने करू शकतात तरी काही जण स्लॉथ असतात. 

मग तुम्हाला काय व्हायचंय? पूल देशपांडेंना सारखा एक प्रश्न विचारते. स्लॉथ का इगल? :)


Monday, October 2, 2023

माझे कॉटन प्रेम

मी आतापर्यंत minimalism वर बरेच लेख लिहिले वाचले आहेत. प्रत्येकाचे  minimalism वेगळे असू शकते. पण तरीही  त्या सर्वांतून एकाच समान धागा धावत असतो. तो म्हणजे कमी असल्या तरीदेखील मौल्यवान, अर्थपूर्ण  किंवा अतिशय महत्वपूर्ण अशा गोष्टींचा समावेश करणे. गम्मत म्हणजे हेच तत्त्व  मला जेंव्हा मला माझ्या वॉर्डरोब ला लावायची वेळ येते तेंव्हा मात्र मी maximalist होते. त्यातही अगदी खास नमूद करण्यासारखे म्हणजे माझे कॉटन प्रेम. किंवा माझे सुती  प्रेम.

कॉटन शी माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे.  पूर्वी मी एवढी कपड्यांची दर्दी नव्हते. बारकावे माहित नव्हते. जे दिसते ते चांगले. किंवा ज्याची फॅशन, स्टाईल चांगले ते छान, असे एक समीकरण होते. अर्थात सगळेच कपडे चांगलेच असायचे. पण तरी त्यात देखील मी कधी फील घ्यायला शिकले नव्हते. कोणत्याही प्रकारचे कापड मला ओके च वाटायचे. एक ढोबळमानाने माहिती होती की नायलॉन, टेरिकॉट, कॉटन, खादी, सिल्क आणि जीन्स वगैरे. खूप वर्षे अशीच गेली.

मग हळूहळू स्वतःचा असा स्टाईल कोशंट बनत गेला मग एखाद्या ड्रेस चे मेकिंग लेबल बघून त्यात मग किती शतांश प्रमाणात कॉटन आहे आणि त्यातला किती प्रमाणात  "टेरी" आहे हे बघायला शिकले. मग एखादे मटेरियल खरखरीत लागले हातांना तर त्याचवेळी त्यातला कॉटन भाग कमी असायचा, मिसिंग असायचा किंवा मग एखादे अनोळखी भलतेच मटेरियल असायचे (जे मला आवडायचे नाही). किंवा कधीकधी कॉटन असले तरीदेखील ते जाडे कॉटन असायचे आणि काही कॉटन एकदम मऊ सुतशार आणि तलम असायचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पातळ असायचे, पण पारदर्शक नाही ;)

मग हळूहळू माझ्या स्वतःच्याच online आर्टशॉप च्या निम्मिताने 'ट्राइब्स ऑफ इंडिया' सारख्या भन्नाट दुकानांची ओळख झाली मग तिथे समजले कि भारतातील असंख्य लघु उद्योगांना , ज्यात क्लोथ मेकिंग च्याही असंख्य उद्योजक उद्योजिका आहेत आणि हे सर्वच जण आपले 'बेस्ट' इथे पाठवतात आणि विकायला ठेवतात. तिथेही कपड्यांचे निरनिराळे सुंदर पैलू माझ्या लक्षात आले. हेही समजले कि आज असंख्य westerners राजस्थान लखनौ सारख्या ठिकाणी आपला तळ ठोकून आहेत आणि ते हेच कपड्यांमधील वैविध्य ऑनलाईन माध्यमातून जगामसोर ठेवतात, त्यांच्या किमती घाऊक INR दरातून USD मध्ये कन्व्हर्ट करून. अर्थात त्यात कॉटन हे नेहेमीच अग्रगण्य असते आणि गम्मत म्हणजे महागही असते.  अश्या कॉटन चा रंग टिकाऊ असतो व तो कित्येक वर्षानंतरदेखील तसाच टवटवीत असतो. किती धुतला धोपटला तरीही त्याचा मऊपणा नेहेमीच एक मायेची ऊब देऊन जातो.

ह्यातही आता मॅन मेड (अथवा ह्यूमन मेड :)) to मशीन मेड असेही प्रकार आलेच आहेत. रेयॉन, कॉटन लायक्रा  ही सुद्धा त्यातली अशीच अग्रगण्य आणि सुंदर फील असेलेली  मटेरियलस. ती ही प्राईस रॅक वर जास्तच असतात .

ही सगळी अफाट रेंज बघितली तर अजूनही काही असेल जे मी मिस केले असेल . अर्थात कॉटन सिमिलर सोडून बाकी सब झुठ असेही मी म्हणत नाहीये. कधीकधी आपल्याला फक्त फॅशन आवडते, कधी लेटेस्ट स्टाईल्स आणि किंमत कमी असली तरी त्यांची फन-व्हॅल्यू नक्कीच जास्त असते.

तरीदेखील, कॉटन ते कॉटन असे म्हणत माझा कॉटन प्रवास लिहावासा वाटला. मग तो प्रवास अंतर्वस्तांसाठी असो अथवा बाह्यवस्त्रांसाठी असो. ;)

Your thoughts ? What are your favorite cloth materials?

Wednesday, April 5, 2023

उठल्या उठल्या

उठल्या उठल्या तुम्ही पहिले काय करता (प्रातर्विधी वगैरे सोडले तर)? हाच प्रश्न युट्यूब वरच्या असंख्य जाहिरातींनाही पडलेला असावा. उठल्या उठल्या तुम्ही करोडपती वगैरे वगैरे व्हायला काय करावे ह्यावरही मी काही जाहिराती बघितल्या आहेत. त्यात डिप्रेशन ट्रीट करणाऱ्या मग सतत आनंदी कसे राहाल ह्याचा उंच क्लेम करणाऱ्या जाहिराती.

मग ह्या सगळ्याचा उठल्या उठल्या तुम्ही actual काय करता ह्याच्या शी काय संबंध? तर उत्तर असे की आपल्या फोन अथवा  स्मार्ट फोने चा वापर.

आपल्यापैकी बहुतांश लोक आज उठल्यानंतर खरोखरच ५ ते १० मिनटात फोन हातात घेत असतील. मग ते कशासाठीही का होईना, अगदी घड्याळातील अलार्म पासून ते असंख्य नोटिफिकेशन्स  च्या लाटा आपल्यावर आदळू द्यायला रेडी असलेले आपण. ते कामाचे चॅट्स , मेंशन्स , पर्सनल चॅट्स, मेंशन्स अगदी ग्रॅटिट्युड उर्फ कृतज्ञता व्यक्त करायला, आपल्या विचार करायला भाग पाडणारी अप्प्स सुद्धा आज आहेत आपल्या अगदी हाताशी. शिवाय काहीतरी इंटरेस्टिंग असा छोटा किंवा मोठा कन्टेन्ट तर असतोच असतो. अगदी पैशाच्या देवाणघेवाणीपर्यंत गोष्टी सहज सुलभ झाल्या आहेत आणि तेही फोन शिवाय जगणे कठीण करत.

मी स्वतः टेकनॉलॉजि मधलीच असल्याने मला gratitude अँप न वापरता देखील टेकनॉलॉजि बद्दल नेहेमीच gratitude वाटत आला आहे. शिवाय मागच्या काही वर्षात artificial intelligence ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे सगळी रेकंमेंडेशन इंजिन्स आतून कशी काम करतात ह्याचाही मला आता खूप चांगला अंदाज आला आहे. अजूनही खूप शिकायचे आहे अर्थात ह्या सगळ्यात आणि ते अमलात पण आणायचे आहे.

तरीही एक गोष्ट जाणवत राहते की ही सगळी इंजिन्स, ह्या सगळ्या नोटिफिकेशन्स च्या मागे माणसाच्या बुद्धिमत्तेला शह देणारे एक अतिशय पुढारलेले इंजिन "running" आहे. त्याला आपण चांगल्या किंवा एफ्फेक्टिव्ह रीतीने कसे वापरू शक्ती ही कला आणि त्यातील शिस्त आपल्या अंगी बाणवावीच लागेल. सोशल डिलम्मा हि नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आपल्यापैकी किती जणांनी बघितली आहे?

अगदी साधा विचार केला तर उठल्या उठल्या आणि त्यानंतर साधारणपणे पाऊण ते एक तास फोन चा वापर शक्य तितका टाळला पाहिचे. हे नुसतेच मी नाही म्हणत आहे. आजच्या काळातले कित्येक spiritual leaders सुद्धा म्हणाले  आहेत, जे शेट्टी त्याच्या काही पॉडकास्टस मध्ये ह्या सगळ्याची कारण मीमांसा देत बोलला आहे. प्रत्येकाचे दैनिक routine वेगवेगळे असेलही, तरी देखील दिवसभरात आपापल्या सोयीप्रमाणे मीडिया /कन्टेन्ट ऑन अँड ऑफ वेळ तर आपण नक्कीच ठरवू शकू. मग त्याला डिटॉक्स म्हणा किंवा मी टाइम म्हणा किंवा काहीही.

The key is that you be the master of the technology and AI you use and not the slave for sure.


Saturday, December 24, 2022

 देशपांडे आणि आम्ही - कल भी आज भी आज भी कल भी

 
सगळ्यात आधी देशपांडे काकांना ९० वर्ष सत्कार समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आई आणि रंजू बरोबरच फोटो आणि सत्कार समारंभातील तुम्हाला गमलेलं जगण्याचं  यमक आणि गमक ऐकून खूप खूप छान वाटले, इतके की ते शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे. कुछ रिश्ते बदलते, नही है कभी, कल भी आज भी आज भी कल भी.

इन यादों का सफर तो रुके ना कभी..खरंच तुम्हाला निर्भेळपणे अगदी तसेच हसताना बघून पुन्हा आमचीही एकदा जगण्याची इच्छा टवटवीत झाली. मंगेश पाडगावकरांचं गाणं तुमच्या सत्कारात आठवलं  गेलं ह्यातच सगळं आलं, ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे... तुम्ही म्हणालात की अभि तो मै जवान हुन.  मीही उगाचच गणिततज्ञासारखं बेरीज वजाबाकी करत माझ्या वयाच्या तुम्ही अंदाजे दुप्पट आहेत हे समजून उमगुन उगाचच मान खाली घातल्यासारखं केलं . :) तुमच्याकडून खरोखरच खूप शिकण्यासारखे होतं आहे आणि असेल. आणि अगदी तुम्हीच नाही सगळेच आमचे देशपांडे कुटुंबीय. आई म्हणाली तसं - काही नाती खूप जिव्हाळ्याची असतात त्यातलं हे एक. ती नाती रक्ताच्या नात्यांपालकडची असतात आणि आपल्याला माणुसकीच्या फार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

सगळ्यात गंमतशीर माझी तुमच्याबद्दलची आठवण म्हणजे गाणे. तुम्ही वेळ मिळाला की सतत गाणे म्हणत असायचात. अर्थात तुमचा क्लासिकल चा रियाज घरीच चालू असायचा तंबोरा घेऊन. कळत नकळत मलाही ते सतत डोक्यात असायचे. पण गम्मत म्हणजे तुम्ही वेगवेगळी गाणी impromtu किंवा ऐनवेळी ही रचायचात. माझ्यावरचं गाणं आठवतंय? स्वाती म्हणजे सव्वा हाती आणि मग सव्वा हाती, दीड हाती, पावणेदोन, हाती दोन हाती सव्वादोन हाती अशी एक पावकीच तुम्ही माझ्या नावाने बनवून, चालही स्वतःची लावून ती मग म्हणायचात देखील. मी लहान होते तेंव्हा, चौथीत असेन तेंव्हा पासून माझा देशपांडे कुटुंबात जो काही शिरकाव झाला तो कायमचा मनावर कोरला केला, नात्यांची, वेगवेगळ्या संवांदांची, एकमेकांकडून काहीतरी शिकण्याची आणि परस्परांवर निर्व्याज प्रेम विश्वास ठेवण्याची एक परंपरांची घेऊन. हे सगळे अलिखित करारातून हं  ? :)

तुम्ही जसं BEST मधल्या नोकरी, शिवाय तुमची संगीत नाटकं किंवा वैचारिक नाटकांमध्ये कामं, योगा आणि चालणे इत्यादी रुटीन छान पार पडायचात तशाच आमच्या देशपांडे काकू सुद्धा त्यांची कामे स्वयंपाक, मुलींचे रुटीन हे सगळे अतिशय हसतमुखाने आणि सचोटीने पार पडायच्या. मीही त्यातलीच, तुमची चौथी मुलगी च म्हणा ना. :) त्या काळातले माझे देशपांडे डेकेअर :) त्यात देशपांडे काकुंनी केलेले सगळेच पदार्थ मीही  अतिशय खादाड असल्यासारखे मनापासून भरपूर खाल्ले आहेत, सगळ्यात लक्षात राहणारे म्हणजे दुपारचे स्नॅक्स चे वेगवेगळे पदार्थ आणि त्यांनी केलेली अंबाडी ची भाजी ज्याला कसलीच तोड नाहीये. त्या माझ्या आईच्या पाककलेमधल्या गुरु उगाचच नव्हत्या? मला दोन्ही सुग्रणींकडून उत्तमोत्तम खायला मिळाले हे माझे treasure, शिवाय बाबाही माझे अधून मधून सुग्रण असल्यामुले एन्ट्री मारत असत तो गोष्ट वेगळी. :)

एक वेगळाच छंद होता त्या दिवसात आईने एखादा पदार्थ जो छान झाला आहे, तो तुमच्याकडे आजून द्यायचा चव म्हणून आणि मग तुम्हीही एखादा पदार्थ आमच्याकडे आणून द्यायचात . अशी चवीची देवाणघेवाण करण्यात न जाणो किती वर्ष गेल्येत.

सांगा कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत? तुमची काही नाट्य संगीत नाटकांतील गाणी सुद्धा मी ऐकली आहेत. त्यावेळी गम्मत वाटायची. तुमचा डे जॉब हा BEST चा असायचा आणि शिवाय तुम्ही श्रीराम लागूनसारख्या हस्तींबरोबर देखील नाटकेही केलेली आहेत. आम्हालाही हमखास पास मिळायचा किंवा खबर असायची. मग आलोच ते नाटक बघायला. तुमचे उद्धस्थ धर्मशाळा नावाचे नाटक मला अजूनही आठवते. विषय तितकासा कळला नसला तरी देखील तुम्ही रंगमंचावर उभे आहेत आणि नाटकातला एक अंक चालू आहे हे मला एकदम आठवत आहे. तुम्ही नक्कीच ते जग जगला असाल एका वेगळ्याच ढंगाने.

अजून एक म्हणजे आपली नाटकांविषयीची चर्चा. तुमच्याबरो मी एक दोन नंतर कधी नाटके बघितली देखील आहेत, आणि मग त्यानंतर होणारी चर्चा विचार विमर्श. :) किंवा मी एखाद लेख लिहिला तरी त्यावरही आपण अख्खी फॅमिली च्या फॅमिली गप्पा मारत असू. किंवा खरा तर टॉपिक कुठलाही असो, चर्चेसाठी आपण सारखेच सरसावून आपले  मुद्दे  मांडून debates करत असू. निष्पन्न काही होवो वा न होवो  :)

आपली अशीच रंगलेली चर्चा म्हणजे योगासने. तुम्हाला मी लहानपणापासून योगा way ऑफ living करताना बघितले आहे. दिवसातील एक ठराविक वेळ तुम्ही योगासनांसाठीच द्यायचातच. त्यामुळे माझे योग विषयक प्रश्नांची उत्तरे तुम्ही आनंदाने द्यायचाय. शवासन कसे करायचे हा प्रश्न मी विचारल्यावर तुम्हे अतिशय systematically मला स्टेप्स समजावून सांगून एकदम सोप्पे करून सांगितलेत. आता देशपांडे काकू नी सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन आईला सांगून मला योगा क्लास ला लावायला प्रोत्साहन दिले.

आता तुम्हाला अजून एक आठवून हसू येईल कि काही गहाण गोष्टींची सविस्तर चर्चा करायला तुम्ही स्वतः आमच्या घरी येत असत. तो विषय म्हणजे हरी जो आपल्याकडे काम करायचा त्याने उधार मागितलेले पैसे. अतिशय इंटेन्सिटी ने हे सगळी चर्चा चालत असे नंतर यथावकाश मलाही कळले हरी असो व हरिणी, आपल्याकडे काम करणारे हेल्पर्स हा हाय इंटेन्सिटी विषय कसा होऊ शकतो. :)

आपण एक सोनाली कुलकर्णी चे चाहूल हे नाटकही बघितले होते तेंव्हा. वेगळाच विषय.

देशपांडे कुटुंबीय आणि सगळेच आवडते, माझा सहवास रंजूबरोबर सगळ्यात जास्त कारण ती सगळ्यात धाकटी मुलगी उजू सुनीती बरोबरही मजा यायची. रंजू मला मेमरी ची आणि इतर पत्त्यांच्या वेगवेगळ्या जादू शिकवायची आणि त्यात तासन तास जायचे. कित्येकदा चौथीच्या scholarship च्या अभ्यासातही ते मला खूप मदत करत असे. गम्मत म्हणजे तुमचा सर्वांचा माझयावर इतका विश्वास होता की,  आईला आणि मला scholarship चा result बघायला जायला तुम्ही बाल्कनी तुन सांगितले होते, आम्ही रोड वर. नक्की मला मिळाली असणार scholarship ,
अशा खाणाखुणा करत. आणि खरोखरच माझे नाव होते, खूपच मस्त वाटलं होता तेंव्हा.

त्यानंतर मग अशीच खेळ अभ्यास ह्यात वर्षे गेली. especially १० वी आणि बारावीच्या माझ्या अभ्यासात शांततेची अत्यंतिक गरज होती. तुमची बाल्कनी हा माझा आवडता प्रांत होता कारण तिथेच मला खरी शांतता मिळत असे आमच्या मजल्यावरच्या गोंगाट, आवाज बघता. तीही तुम्ही मला एकदम मोठ्या welcoming मनाने दिलीत आणि तासंतास तिथेच टाका तंबू हे माझे तेंव्हाचे ब्रीदवाक्य झाले होते. एका घरातून आपल्याच दुसऱ्या घरात. पण तुम्ही कधीही मला जाणवू दिले नाहीत कि आपण फार काहीतरी करतोय. ह्या सगळ्याबद्दल मी तुमची ऋणी आहे.

सस्मित ही म्युसिक शिकवणे आणि परफॉर्मन्स अपडेट्स च्या माध्यमातून आशिष आणि किमया गौरी ह्यांच्याशी touch मध्ये असतो.

देशपांडे, आता काळ खूप बदललाय का ? वाटते कधीतरी.  आमच्या पिढीतल्या, असलेल्या वयापेक्षा कितीतरी पटीने असल्यासारखे वागणाऱ्या आणि मनाने खंगलेल्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयन्त. कोरोना सारख्या मोठ्या standstill काळातून आपण बाहेर आलो आहोत आणि नवीन आदर्श- रोल मॉडेल्स शोधत आहोत. त्यात तुमचा आणि तुमच्याबरोबर सत्कार झालेल्या सगळ्यांचाच सिंहाचा वाट आहे आणि समाजचे हे देणे आहे. एका चांगल्या समाज निर्माण करण्याकडे कूच करत. ikigai हे जॅपनीज पुस्तक खूप प्रसिद्ध झाले. It is defined as "a motivating force; something or someone that gives a person a sense of purpose or a reason for living". तुम्ही आपले इंडियन ikigai! :)

पुन्हा एकदा सर्व देशपांडे कुटुंबियांचे अभिनंदन. कुछ रिश्ते बदलते नही है कभी. हे मलाच नाही तर सगळ्या रुद्रांनाही सेम वाटत आहे ह्याची मला खात्री आहे.

तुमची
सव्वा हाती

चीज पास्ता पेरी-पेरी

तसे मला चीज नाचों पास्ता पेरी-पेरी  ह्या गोष्टींबद्दल काहीच वावगे नाहीये. पण 'बी अ रोमन व्हेन इन रोम' ह्या मताची मी थोडी फार आहे आणि त्या आपल्या करीना कपूर च्या डाएटिशिअन, ऋजुता दिवेकर ने म्हंटल्या प्रमाणे लोकल फूड ला प्राधान्य देण्याबद्दल माझाही थोडा कल असतो.

पण आजकल बच्चो और सबको को सिर्फ बर्गर और पास्ता ही पसंद है मग तो मैद्याचा आणि घट्टमुट्ट झालेल्या पेंनी पास्त्याच्या का होईना. मग तो पिंक (म्हणजे गर्ली श ?)  असो किंवा ब्लू पास्ता असो (असं काही ऐकलं तरी नाहीये पण उगाचच काही तरी गर्ल्स बोइज ;)) . आता त्यातही खूप प्रकार आहेत. फिफ्टी शेड्स ऑफ पास्ता यू सी? ;) मग त्यात मी जर्मनी त बघितलेल्या अगणित चीज च्या भेरायटी एकदम आठवतात आणि मन माझे भरून येते, आणि तिकडच्या हवामानासाठी एवढे चीज नक्कीच ठीक आहे.

आता ह्या १००० शेडस मधून शॉर्ट लिस्टेड ५०शेड्स निवडायच्या आणि मग त्यातून फायनल पास्ता चे कॉम्बिनेशन अचूक पणे निवडायचे ह्याला खरोखरच कलिनरी स्किल लागते. जे माझ्यात नाहीये. ह्या सगळ्यात असलेला चॉईस ओव्हरलोड तर विचारायलाच नको. ग्रे आणि पिंक ह्यात कलर वाईस फारसा फरक कुठे आहे? इट इस ओरिजिनली अ 'derived color' आफ्टर ऑल.

अशा सगळ्या बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन प्रोसेस नंतर मी जेंव्हा पास्ता चीज रेस्टॉरंट मध्ये जाते तेंव्हा मी किती गोंधळलेली असेन ह्याचा विचारच न केलेला बरा. लहान छोटी मुले ही पण सराईतपणे ऑर्डर्स देतात आपल्याला हवी ती पिंक शेड चूज करतात आणि त्या चॉईस ला योग्य ते मार्गदर्शन करणारी आजूबाजूची मोठेकंपनी मला अतिशय impressive वाटते. तब्बल अर्धा तास मग निर्णय घेण्यामध्ये छान निघून जातो. आजूबाजूला तोपर्यंत गर्दी वाढलेली असते आणि अचानक सीझलर्स चा झरझरीत आवाज यायला लागतो. मग आपण एवढा व्यवस्थित वेळ घेऊन ठरवलेल्या पास्ता च्या घड्यावर - पालथ्या घड्यावर पाणी पडते. अचानक सीझझलर्स चा मोह होतो आणि वाटते के सीझझलर्स मध्ये कदाचित जास्त मजा आहे. (इस इट लोकल फूड बाय द वे ?)

तसे बघायला गेलो तर सीझलर्स आणि पास्ता ह्यात मला सीझलर्स च जास्त प्यारे आहेत, पूछो क्यों? कारण पास्ता मध्ये भाज्या ऑपशनल असतात आणि सीझलर्स उसळणाऱ्या लाटांसारखे का होईना पण त्यात भाज्या तरी असतात. भरपूर तापलेला तवा आणि त्यात अतिशय सुंदर रित्या मांडलेले सीझलर्स.  मग मी आधीच सीझलर्स ना माझी मान्यता  देऊन टाकते.  एक बर्फी मधले गाणे ही आठवते. "इतनी सी भाजी, इतनी सी खुशी, इतना सा तुकडा भात का".

तो पर्यन्त अजून एक वैचारिक संकट आलेले असले ते म्हणजे पेरी-पेरी वाले फ़्राईस घ्यायचे का साधे. किंवा से कोला फ्लेवर चे फ़्राईस का चीज फ्लेवर चे फ़्राईस. आजकाल कुठंतीही गोष्ट ह्या त्यात अनोखा चीज फ्लेवर येतोच विथ ऑपशन्स सच ऍज पेरी-पेरी, चुई मुई etc. :) आता आपली पाव भाजी च घ्या ना. पाव भाजी विथ चीज, आणि मग डोसा विथ चीज, नाचों विथ चीज , शिवाय फ्राईड राईस विथ चीज. वगैरे वगैरे. तोपर्यंत आपला पेरी-पेरी चा प्रश्न सुटलेला असतो. तोपर्यंत मी ही गुगल किंवा डकडक गो सर्च करून पेरी-पेरी म्हणजे काय ह्याची माहिती मिळवून ठेवलेली असते. तर युरेका. "PERi-PERi, also known as the African Bird’s Eye Chilli". हे उमगते आणि मग थोडीशी कोडी सुटायला लागतात. थोडक्यात सारांश असा की पेरी-पेरी हे आपल्या लाल तिखटाचे आफ्रिकन व्हरजन.

मध्यंतरी एका मैत्रिणी गेले तर मी तिथे पोचेपोचेपर्यंत मॅकडोनल्ड चा बर्गर आणि पेरि-पेरीं फ़्राईस माझ्याही आधी येऊन पोचत होते हुश्श्य करत. तेही झोमॅटो वरून. असेच पेरिफेरल आनंद घेत घेत मी देखील 'ऑड वन आऊट' न दर्शवत पेरी-पेरी गट्टम करते.

तर कॉमिन्ग बॅक टू पिंक पास्ता इटिंग. आता असं आहे की जितका वेळ आपण पास्ता रदळत ठेऊ तितका  वेळ तो अजूनच निगरगट्ट होत जातो. तोपर्यंत पास्ता मधला इंटरेस्ट संपत संपत आजूबाजूच्या सीझलिंग गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागलेला असतो. पण तरीही लगे राहो मुन्ना भाई म्हणत म्हणत पास्ता एकदाचा संपतो.

तोपर्यंत मग वेळ येते ती अर्ध्या उपाशी पोट्या डेसर्ट ची.  सीझलिंग ब्राउनी हा त्यातलाच एक प्रकार. ह्याच्यातही तो सीझलिंग तवा री-यूज केला जात असणार. खूप जणांना सीझलिंग ब्राउनी च प्यारी असल्याचे  माझ्या लक्षात आले असल्यामुळे मी गप्प बसते. मीही काही त्या सीझलिंग ब्राउनी च्या विरोधात थोडीच आहे? मग 'खोदा पहाड निकाल चूहा' म्हणी सारखी ती सिझलिंग ब्राउनी येते सळसळत. खूप मोठा आवाज, वाफ आणि मग वाफेला बाजूला सारून बघतो तर काय? त्यात एक सुंदरशी छोटीशी ब्राउनी असते. मग त्यावर गरम गरम ज्वालामुखीसारखा पसरत जाणारा चॉकोलेट सॉस. तोपर्यंत वातावरण तंग झालेले असते. शिवाय आपले ब्रीदवाक्य आहेच, शेरिंग इस केरींग.

आता हे ४ बाय ३ इंचेस ची ब्राउनी कशी काय बुआ खूप जणांमध्ये शेअर करून केरींग दाखवणार? मग असं म्हणत काही सुज्ञ जण ह्यावर पुन्हा एकदा सेम तोडगा काढतात. तो म्हणजे preemptive ऑर्डर्स. सुमारे प्रयेकाला एक तरी सीझलिंग ब्राउनी त्यामुळे मिळूनच जाते. म्हणजे एखादा चमचा वगैरे. एवढे कमी गोड़ मला चालत नसल्यामुळे मी घेतच नाही :) खाईन तर तुपाशी नाही तर ..:) अरे आधीच उपाशी मग शिवाय एवढे करूनही आपण उपाशीच? ये न्याय नही अन्याय है. असे आपली हिंदी पिक्चर मधील राखी म्हणेल.

आता पर्यंत राहिलेल्या प्लेटांमधील 'नाचों विथ चीज' ला बाय बाय करून मी काढता पाय घेते.

Saturday, June 11, 2022

ऐसे कैसे ये 'ऊस का ढाबा' ?

उत्तरांचल ट्रिप मध्ये नुकतेच 'ऊस दा  ढाबा' नावाच्या एका नवीनच चालू झालेल्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा महायोग आला. डेहराडून च्या वाटेतच लागणारे एक रेस्टॉरंट एकदम भरपूर जागा असलेले आणि उगाचच गजबजलेले दिसले. वाटले, नक्कीच इथे छान पैकी उत्तर भारतीय जेवण उर्फ पंजाबी स्टाईल जेवण मिळेल. असाही प्रश्न डोक्यात आला की अशा आगळ्यावेगळ्या नावाचा अर्थ काय?? ऊस तर कुठे दिसत नाहीये.

 गेल्या गेल्या दिसला तो मस्तपैकी उंच काचांच्यामधून दिसणारा बाहेरचा व्ह्यू. वाटलं आता इथेच टाका तंबू! पण तेवढ्यात वेगळेच चित्र दिसले ते आपल्याकडे पाठ फिरवून बसलेल्या खुर्च्या. रिकाम्या. म्हणजे येणाऱ्या माणसांनी खिडकीकडे एकटेच त्या पाठमोऱ्या खुर्चीत बसून काचेतून बाहेरचा देखावा बघायचा. कोण्णी कोंणाशी बोलायचे आणि कोण्णी कोंणाकडे बघायचे नाही! उजवीकडे एक मोठा काउंटर आणि तिथे खूप जण गडबडीत आणि अविरत काम करताना दिसतायत.

हे सगळं शिरल्याशिरल्या पहिल्याच १-२ मिनिटात कळल्यानंतर आम्ही एक समोरचेच टेबल पटकावले. बिना व्ह्यू वाले. मग नवीनच दुसरा एक व्ह्यू समोर आला. ममोरच्या त्या काउंटर मधील लोकांमध्ये एक नुकतच 'बिझनेस' चालू केलेला आणि त्यात सपशेल गडबडलेला एक मनुष्य अस्वस्थपणे येरझाऱ्या घालताना दिसला. तो ह्या टायटॅनिक चा कॅप्टन. किंवा नुकत्याच लाँच केलेल्या आय पी एल टीम चा कर्णधार. सगळ्यात नीट नेटका तोच होता आणि आपल्या टीम मधील प्रत्येकडे जातीने दाखल देत असावा असेही वाटले.

आता आपण 'उस का ढाबा' च्या कट्ट्यावरती त्या कॅप्टन च्या क्रिकेट टीम कडे वळूया. जवळजवळ १३-१५ जणांची ही टीम सुद्धा त्या ढाब्या भर, कॅप्टन सारखीच सैरावैरा फिरत होती.  हे सगळे काय करत होते ह्याचे कुतूहल मी अजून वाढवत नाही.

कारण आम्ही आमचे टेबल पटकावताच एक उंचपुरा टीम मेंबर अचानक काहीही न विचारता ठण्णकन एक थंडगार बिसलरी ची बाटली ठेऊन देत एखाद्या चुकलेल्या चेंडू सारखा दुसरीकडे लगबगीने निघून गेला.  मग आमच्याकडे आलाच कशाला आणि काहीही ग्रीट वगैरे न  करता, हसता बिसता, आम्हाला नको असलेली पेड बिसलेरी ची बाटली थोपवत गेलाच कशाला. आलेल्या गिर्हाइकांना ग्रीट करणं , काय हवं आहे विचारणे (पाणी बिसलेरी, का साधा aqua-guard का , का साधा इच?:)) , मेनू कार्ड देणे हे प्राथमिक मॅनर्स ही नसावेत. असो.

आम्ही ही त्याला हाल्या हो करून बोलावले. मग तो एक भले मोठे (इथे नॉर्थ मध्ये सगळेच मोठे मोठे असते ) मेन्यू कार्ड ठण्णदिशी ठेवून गेला. तेही पुठ्याचे होते आणि कॉम्प्लिकेटेड होते. मला कोणतेही मेन्यू कार्ड कॉम्प्लिकेटेड च वाटते ही गोष्टी वेगळी. पण ऊस दा ढाबा चे तर अजूनच किचकट. कारण त्याची multiple versions वेगवेगळ्या टेबलांवरती होती. एक दोन जास्तीचे प्रश्न विचारल्यावर तो मग अजून गोंधळून मग त्याने finally एक त्यातल्या त्यात सगळ्यात बिनचूक version आणून आम्हाला दिले. लेटेष्ट :)

आम्हाला ही घाई असल्याने पटकन ऑर्डर केले आणि मग त्याने ते यथावकाश आणून दिले. थंड गार वगैरे. काही गोष्टी तर चक्क फ्रिज मधल्या डायरेक्ट ठेऊन दिल्या होत्या पानात.

मग इकडे काउंटर वर ipl टीम ची लगबग चालूच होती. आजूबाजूला त्यामानाने customers अजूनही दिसत नव्हते.  तरीदेखील बिलिंग काउंटर वरती उगाचच गदारोळ माजलेला. अधूनच मध्ये काही लागलं तर विचारावं म्हंटलं तरी तो ओरिजिनल वेटर त्या खिडक्यांच्या बाहेर बघत काहीतरी acting busy. मेनू कार्ड हातात. कदाचित अजून एक version काढत असावा. एक पुठयाचे एक कागदाचे एक चायनीज चे, एक उपरवाले के नाम से, ऊस का धाब्याचे. फुल्ल अँड फायनल version.

आम्हीही आटोपते घेतले. बिलिंग काउंटर वरच्या एका माणसाला तरी म्हंटलं फीडबॅक देऊया. आजकाल फीडबॅक चे फार असते. कस्टमर म्हणून कधीतरी फीडबॅक द्यायची सुरसुरी येतेच. especially अशा ठिकाणी. जिथे आता ह्यापुढे सगळेच ऊस के नाम. उर्फ उपरवाले के नाम. :)

परत कधीही इथे येणार नाही असे उगाचच मनाशी ठरवत मी बाहेर पडले.

Saturday, March 5, 2022

दही नावाचे कल्चर

चांगले दही लावता येणे ही एक अतिशय दुर्मिळ कला आहे. म्हणजे पाककला. असे मला वाटते. पूर्वीपासून माझा पहिला प्रश्न होता तो म्हणजे दही लावायला लागणाऱ्या दह्याला विरजण का म्हणतात? दोन्ही सारखेच, मग विरजणा चे दही लावून त्याचे दही लागते हा वाक्प्रचारच मला चुकीचा वाटायचा. आणि गम्मत म्हणजे आजूबाजूचे सगळेच ह्या दुर्मिळ कलेत पारंगत असलेले लोक त्याला विरजण च म्हणायचे, त्यामुळे मी अजूनच कोड्यात पडायचे. आणि अशा शाब्दिक कोड्यांमध्ये मला उगाच रमून जायला आवडत असल्याने प्रत्यक्षात दही लावण्याची प्रक्रिया मी चालू करायला खूप वेळ लागला. 

अटलांटा मध्ये राहताना एक कॉम्प्लेक्स मधली मैत्रीण म्हणाली, "मी भारतातून कल्चर घेऊन आले आहे", तेंव्हा मी सपशेल कोड्यात पडले. भारतीय संस्कृती म्हणजेच कल्चर, जगप्रसिद्ध आहे हे खरे पण कल्चर केबिन बॅग मध्ये घालून इकडे तिकडे असे नेलेही जाऊ शकते हे मला माहीतच नव्हते. मग पुन्हा एकदा विरजण हा विषय माझ्यासमोर आला. तिने मला समजावून सांगितले की कल्चर पासून कर्ड्स बनवतात आणि तेच ते आपले विरजण ह्याचा मला साक्षात्कार झाला. मग मला हळूहळू कळले की दही लावणे ह्या कलेवर मनापासून प्रेम करणारे जण कोणत्याही कोलांट्याउड्या मारून घरी दही लावण्याची बाजी मारू शकतात. हे ही बाजीप्रभू च, नाही का? हळूहळू मलाही दही लावण्याच्या प्रक्रियेमध्ये खूपच इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग ठरवले की कितीही अडचणी येवोत. मी उत्तम दही लावणारच. 

आणि अजूनही ती कला मी अवगत करण्याचा प्रयंत्न करत आहे. बऱ्याच तांत्रिक गोष्टी आता मला माहित झाल्या आहेत ह्यातल्या आणि ही  नुसतीच कला नाही तर विज्ञानही आहे हे मला नक्कीच जाणवते. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचे तर त्यात प्रचंड मॅनेजमेंट ही आहे. आता हेच बघा ना, ह्या प्रक्रियेला पहिले लागते ते म्हणजे विरजण. म्हणजे SIPOC च्या भाषेत बोलायचे तर इनपुट. मग हे इनपुट देणार कोण? आताच्या काळात कोण विरजण देणार? कारण कोण दही घरी लावतो ह्यावरून त्याचा supply किती कमी आहे ते लक्षात येते. आता हा मग तुम्ही म्हणाल की  एकदा विरजण घरी आणले की मग हाय काय आणि न्हाय काय? सोप्पे.  पण नाही. आपला ओव्हर  प्रमाणात असलेला आत्मविश्वास आड येऊ शकतो. जर का काही कारणाने दही नीट लागले नाही  तर तुमच्याकडे बॅकअप काय? सो, पहिल्यांदा जेवढे कल्चर आहे त्याच्या अर्धेच वापरा आणि स्टॉक घेताना जास्त घ्या :) 

मग आपण वळूया दुधाकडे, दही लावताना तीन इनपुट्स लागतात. विरजण दूध आणि लक्ष :) त्यातले दुसरे इनपुट म्हणजे दूध आणि दुधाचे तापमान हे हवामानाप्रमाणे बदलत जाते तरीही जास्त करून जास्त तापमान दही चांगले लागायला अनुकूल ठरते.मग ती तयारी झाल्यावर आपण येतो ते SIPOC मधल्या P कडे म्हणजे process कडे. विरजण गरम दुधामध्ये घातले की ते सतत हलवत राहावे लागते. जितके जास्त म्हणजे तब्बल १५ ते २० वेळा ढवळून घेतले की  मग ते सर्व मिश्रण एकरूप होते. मग तुम्ही त्याच्याकडे न फिरकायला मोकळे, काही तास तरी. :)

आता प्रश्न आहे किती तास. आता पुन्हा हे एक system variable आहे. कारण तेही बाहेरचे तापमान आणि अशा काही आपल्या कंट्रोल च्या बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असते. तरीदेखील साधारणपणे ६ ते ८ तासांमध्ये चांगले दही लागायला (माझी) हरकत नाही :) पण माझ्या हरकतीला कोण विचारताय? अधून मधून टेहळणी करायला लावलेल्या दह्याकडे येताच राहावे लागते कारण मग च कळते की ते व्हायला अजून अंदाजे किती वेळ लागेल किंवा आंबट झाले असेल तर व्हेदर इट इस टू लेट. असो. आणि हो, हे सगळे करताना लावलेले दही लागले आहे का नाही ते बघायला गदागदा बाउल हलवू नये त्यातून निष्पन्न कित्येकदा काहीच होत नाही पण अर्धे मुर्धे दही वायाच जाते. आता अर्धे मुर्धे वरून आठवले की एक अधमुरे दही म्हणूही एक प्रकार आहे. ज्यांना ज्यांना दही अधमुरे म्हणजे अर्धे मुर्धे लावलेले आवडते त्यांनी ती process लवकरच आटोपती घ्यावी आणि मग ते अधमुरे दही तयार. अर्थात मी ह्या वाटेल कधीच गेले नाहीये. तर असो, आता एक गम्मत आहे ह्या सगळ्यात ती  म्हणजे काळ काम वेग. 

दही नक्की लावायचे कधी? दिवसातल्या कोणत्या वेळी? दिवसा? मग ते तुम्ही दही चांगले लागण्याच्या वेळी फ्रिजमध्ये ठेऊ शकाल का हे गणित महत्वाचे. आणि जर रात्री लावले तर ते तुम्ही सकाळी ते फ्रिज मध्ये ठेवणार कधी हेही महत्वाचे? मग सगळा फोकस सकाळी उठता कधी ह्यावर येऊन दह्याचे गाडे ठप्प होऊ शकते. कारण कितीही तुम्हाला बेरजा वजाबाक्या जमल्या वेळेच्या, तरीही झोपला तो संपला. सध्या तरी कोरोना मध्ये जास्त करून लोक घरातच असल्याने सकाळी दही लावण्यासारखा सोप्पा मार्ग नाही, मग ६ त ८ तासात सगळी प्रोसेस नीट, मग अगदी झोपेत सुद्धा, तुम्ही पार पडू शकता. 

पण आता जाता जाता काही चुका. आणि त्यांचे प्रामाणिक कॉन्फेशन. हा लेख वाचून असे वाटले असेल की मी खूपच पारंगत आहे ह्या विषयात तरी तसे नाहीये. नुकतेच मी दही आणि भाजी चे बाउल्स, दिसायला सारखेच असल्याने भाजी microwave ला लावायच्या ऐवजी दहीच लावले. :)  आणि मग रेस्ट इस हिस्टरी. अतिशय भयभीत होऊन मी ते दही उर्फ विरजण microwave मधून बाहेर काढले. बाहेरून- ऑल लुकड वेल. तेच दही मग मी पुन्हा फ्रिज मध्ये ठेऊन पुन्हा एकदा त्याचे नवीन दही लावले. आणि ते कसे लागले? any guess ? 

मस्त लागले एकदम. :) सो तुम्हीही बिनधास्त पणे हा उपक्रम हातात घ्या आणि हो. DevOps आणि Continuous Improvement लक्षात ठेवा..:)

आणि नुकत्याच केलेल्या online research नुसार, कल्चर उर्फ विरजण ही अमेझॉन अशा प्लॅटफॉर्म्स विकायला available आहे, तेही एक अतिशय देखण्या पॅकेजिंग मध्ये. So there is a huge market for it . एक विचार आला. आपल्यातला प्रत्तेक जण जर दही घरी लावायला लागलो अथवा शिकलो तर पुन्हा एकदा आपण एकमेकांकडून आपण विरजण द्यायला आणि घ्यायला लागू.... 

Monday, February 28, 2022

आवाज कोणाचा?

टीव्ही चा आवाज बारीक करता का जरा? हा प्रश्न मी लहानपणीआमच्या मजल्यावरच्या कित्येकांना कित्येकदा विचारला असेल त्याचा सुमार नाही. राजमाह बिल्डिंग  मजल्यावरच्या बारा घरांपैकी कित्येक घरांमध्ये त्यांचा टीव्हीचा आवाज मनाला येईल तितक्या उच्च प्रतीचा ठेवला जात असे. मग त्यात चढाओढ. भला इसका आवाज मेरे आवाज से ज्यादा कैसा?    

तरी एक बरं तेंव्हा चॅनेल्स दोनच होती. एक डीडी १ आणि २. पण तरीही हर तऱ्हेचे आवाज आजुबाजूनी येत असत. आओ मारी साथे , संता कुकडी, मग छायागीत, मग अजूनच काहीतरी, ह्यांची भेळ होऊन मग एक वेगळाच integrated आवाज ऐकू येत असे. त्यात मग खरा कोणी आवाज जास्त ठेवलाय त्याचा शोध घेत घेत मी शेरलॉक होम्स सारखी डिटेक्टिव्ह गिरी करत त्या घरात पोचायचे. अर्थात दारे उघडीच हे सांगायला नको. मग मी ऍक्शन सकट  टीव्ही चा आवाज कसा अँटी क्लॉक वाईज फिरवून तो कमी करता येईल त्याचे प्रात्यक्षिक द्यायचे. मग काही जण सहकार्य करणारे तर काही असहकार पुकारणारे. ह्यातच मग मार्ग काढत काढत मी मग ओव्हरऑल आवाज कमी झाला आहे ना, हे बघत पुन्हा घरी येऊन आपल्या जागी काहीतरी वाचायला बसत असे. 

मग तेवढ्यात नवीनच आवाज. तो म्हणजे ५ व्या मजल्यावरची integrated भांडणे आणि त्याचा आवाज. आता हे निस्तरायला मात्र मी जात नसे. बाबा किंवा कधी आई, तर कधी इतर कोणी  मग दार उघडेच असलेल्या ज्या घरातून सर्वात जास्त भांडणांचा आवाज येत असे, तिकडे शेरलॉक होम्स गिरी करत जात असत आणि जातीने दखल घेत भांडणे निस्तरत असत. 

ह्या सगळ्यातून थोडीशी सुटका करत शांतता झालीच, तर मग तेवढ्यात निर्माण झालेल्या शांततेत अजून एक आवाज येत असे. ती म्हणजे अहोरात्र वाहात राहणाऱ्या लेडी जमशेदजी रोड चा आवाज. हा मात्र कमालीच्या बाहेरचा आणि कधीकधी अस्वस्थ करणारा आवाज असे. मुश्किलीने मिळालेल्या शांततेतूनही अशांतता दर्शवणारा हा आवाज मी कधी विसरणार नाही. हा आवाज कोण बारीक करणार? तरी पाचव्या मजल्यावर आवाजाची तीव्रता नक्कीच कमी असे. परंतु फक्त किर्र रात्रीचे काही तास वगळता हा आवाज सिंगल डेकर , डबल डेकर, फेरीवाले, टॅक्सीवाले, रात्रपाळी करणारे, दिवसाची सुरुवात होता होता सूर्याबरोबरच लोकल ट्रेन पकडायला निघालेले, कधी कर्ण कर्कशः ब्रेक मारणारे, कधी लांबवरच्या मिल्स मधून आमच्यापर्यंत पोचणारे, कधी दुकानाचे शटर उघडल्याचे , कधी दुकानांचे शटर बंद केल्याचे, कधी लहान मुलांचे रडतानाचे, तरी कधी कोणीतरी धावत जातानाचे, कधी थकलेल्या पावलांचे तरी कधी उगाच लगीनघाई लागल्यासारखे हॉर्न चे. कधी दोन सिग्नल्स मधील अंतर कमीत कमी वेळात कापणाऱ्या वाहनांचे. कसलीतरी घाई. कुठेतरी पोचायची. कुठूनतरी निघायची. कधी बीएमसी ची गाडी आली गाडी करत बोंबलत जाणाऱ्या माणसांचे आणि मग भीतीने भाजीवाल्यांच्या धावपळीचे. कितीतरी आवाज. नॉइज. 

आणि मग त्यातूनच शांतता शोधणारा माणूस. बाल्कनी कम किचन काम बाथरूम अशा एका कोपऱ्यातून लांब कुठेतरी बघत राहणारे माझे बाबा. शांतता शोधात. एक कलाकार. 

सगळेच आवाज आपण शांत करायला सांगू शकत नाही. एक पूर्वी वाचले होते. दोन तेवढ्याच ताकतीचे चित्रकार. त्यांनी दोन चित्रे काढली. एकाने peace म्हणून सुंदर से देखणे असे निसर्गचित्र काढले. त्यात सगळेच निरामय. सुंदर सरोवर. सुंदर पक्षी. सुंदर फुले. असेच काही. आणि दुसर्याने डोंगराडोंगरामधून वाऱ्या खोऱ्यातून स्वतःला वाचवणारे पक्षी. कुठेतरी आडोसा घेऊन थांबलेले. हे वादळ संपले, हा घोंगावणारा आवाज संपला की  मग पुन्हा दऱ्याखोऱ्यातून फिरू, असा विचार करत. दोन्ही चित्रे सारखीच.  दोन्हींमध्ये peace, नीट बघायला गेलो तर. खरा peace कुठे असतो? मला वाटतं आपल्या अंतर्मनातच तो दडलेला असतो. कुठेतरी. कोणाबरोबर तरी. कशाबरोबर तरी. 

  आपल्या मनातही असंख्य विचार येत असतात एक वेळी. कधीकधी तर ते एखाद्या वादळी लाटेसारखे एकावर एक अक्षरशः  आदळत  असतात आणि शांतता नावाचा किनारा पटकन सापडत नाही. अथक प्रयत्न करून कधीकधी मेडिटेशन जमते. कधीतरी सजगत्या जमते. तर कधी मृगजळासारखं  ते आटोक्यातला वाटतच नाही. मग अचानक आपण जेंव्हा सोडून देतो, किंवा आवाज आणि तो noise ह्याकडे अलिप्तपाने बघायला शिकतो तेंव्हा कधीतरी युरेका क्षण येतो. 

आताशा सुद्धा मी बिल्डिंग च्या खाली असलेल्या हुंडाई शोरूम मध्ये प्रत्येक सेल झाल्यावर उच्च पट्टीत लावलेल्या आरत्यांच्या विरोधात कधीतरी शांतता मोहीम काढतेच. पण आता मी शेरलॉक होम्स नाही हे मला कळून चुकले आहे. :)

Saturday, February 29, 2020

शिट्टी

शिट्टी म्हणजे शिट्टी म्हणजे शिट्टी असते, तुमच्या आमच्या कुकर ची  सेम असते :-) पण खरंच असते का? काही जणांना शिट्टी ही जागच्या जागी मिळते. मग ती एकवचनी असो का अनेकवचनी. म्हणजे साध्या कुकर ची एक शिट्टी असो किंवा थोड्याश्या वेगळ्या अशा वेगवेगळ्या कूकर्स च्या वेगवेगळ्या शिट्ट्याअसोत. त्या मिळणार म्हणजे मिळणारच एकाच जागी. अगदी आदर्श म्हणजे ज्या कुकर ची शिट्टी असेल त्या कुकर च्याच झाकणाबरोबर अडकवलेली. असतात काही कूकर्स आदर्श :-) आणि ते कुकर मेन्टेन करणारे ही. आणि त्याच बरोबर अजूनही एक प्रकारची माणसं असतात ज्यांच्या स्वयंपाकातील तब्बल २० सुरवातीची मिनिटं शिट्टी शोधण्यात जातात. मग आखिर कर ही शिट्टी कुठेतरी अडगळीत मिळते. असो तर प्रत्येक शिट्टीच्या वेगवेगळ्या तर्हा.

पण अर्थात ही शिट्टी ची भट्टी इथे खरी सुरु होते. कारण शिट्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आपापल्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. गॅस चालू होतो तेंव्हापासूनच काही जण उगाचच गॅस वर असतात, कधी शिट्ट होणार कधी शिट्टी होणार. तब्बल दहा मिनिटं होऊन  गेली , अजून ती झाली नाही :-) मग अजून टेन्शन. मग उगाचच भिरभिरल्यासारखा कुकर जवळून येरझाऱ्या घालणे वगैरे वगैरे. मग एकदाची पहिली शिट्टी होते. मग तर  खरा  लपंडाव चालू होतो. कारण एकदा भट्टी जमली की मग शिट्ट्या भरभरच होणार. पण तरीही काही जण मध्येच येऊन गॅस बारीक बारीक करून जातात. मग बारीक लक्ष ठेवतात. मग पुन्हा काही वेळ  शांतता शिट्टी चालू राहते. मग मात्र नो लूकिंग बॅक. हे सगळं होत असताना हे लोक अतिशय त्रस्त असतात कारण शिट्टी होणं आणि गॅस बंद करणं ह्यावरच ते लक्ष केंद्रित ठेवतात. Goal-centric, you know. :-)

आता काही जण अतिशय निर्धास्त असतात शिट्टी बद्दल, मी बारकाईने बघितलं आहे की त्यांना ढम्म नसतं, कि शिट्टी होत्ये का नाही, किती शिट्ट्या होतायत, कधी होतायत वगैरे वगैरे. 'संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही..', अशा अविर्भावात. मग अशा वेळी बाकीचे अजुनबाजूचे टेन्शन घेतांना  दिसतात.म्हणतात ना, 'Problems in the universe remain constant, they just get transformed from one problem domain into another', तसंच.  

आणि अजूनही काही जणं असतात जी मात्र शिट्टी बद्दल apt-relaxed असतात. म्हणजे काय उगाच काहीतरी नवीन टर्म का? तर हे जणं शिट्टीशी एकरूप असतात. आपापली कामे चालू ठेवत शिट्ट्यांबद्दल जागरूक असतात, आणि योग्य वेळ येताच कूकर शांतपणे बंद करतात. आणि एवढे थंड राहूनही आतले जिन्नस, म्हणजे मोस्टली भात , वरण भात एकदम व्यवस्थित शिजलेला असतो. काय जादू ना?

तर अशी ही कूकर ची भट्टी . जमली तर जमली.  तुम्ही कोण, पुणेकर का मुंबईकर का नागपूरकर? :-) काहीही असो, एक नक्की कि आजकालच्या anxiety जमान्यात शिट्टी सारख्या क्षुल्लक गोष्टीवरून तरी आपला जीव आटवून रक्तदाब वाढवून घेऊन नये एवढेच मनापासून वाटते. :-)


Thursday, August 15, 2019

पॉप कॉर्न टाइम आयेगा?

आधीचा 'अपना टाइम आयेगा', ह्या लेखानंतर नवीन काही सुचलेच नाही. आणि आता एकदम  त्याच धर्तीवर नवीन लेखाचे नाव ही सुचले, पॉप कॉर्न टाइम आयेगा??

हे पॉप कॉर्न प्रकरण मला विशेष कधी फारसे झेपले नाही. मूव्ही म्हणजे एक अनुभव असतो, एका वेगळ्याच जगात जाण्याची संधी असते आणि त्या जगात फेरफटका मारताना थिएटर एक्सपेरियन्स अजूनच चांगला वाटतो कारण त्यात दृक्श्राव्य माध्यमातून आपण खरोखरच त्या व्यक्तिरेखांपर्यंत पोचतो, त्यांचे भावविश्व अनुभवतो आणि त्यात मग छान साऊंड इफेक्ट आणि मोठा स्क्रीन नक्कीच एक जास्त वेळ टिकेल असा प्रभाव आपल्यावर टाकू शकतो.

पण हे सगळं सोडा, हे पॉप कॉर्न कुठून आले आणि तिखट झाले कळत नाही. कारण मुव्ही बघणं आणि पॉप कॉर्न खाणं हे एक समीकरणच झाले आहे, कितीतरी ठिकाणी आणि कितीतरी जणांच्या मनात. त्यातल्या काहींना खरोखरच पॉप्स आवडत असतील आणि काहींना सोशल कंडिशनिंग मुळे आवडायला लागले असतील. 

मागच्या वेळी  एकदा थिएटर च्या आत जायला रांगेत उभे असताना एक मोठाच्या मोठा पॉप कॉर्न चा पुडा आधी हिंदकाळत आला आणि मग त्या मागे त्यामागची व्यक्ती. मग ती व्यक्ती त्या तडक्यांना सांभाळत सांभाळत अचानक धडपडली आणि सगळेच पॉप कॉर्न्स भसाभसा जमिनीवर. मग थोडा फार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि मग पुन्हा त्या व्यक्तीचे थिएटर कडे प्रस्थान, तेही डुगडुगत. मी पॉप कॉर्न्स चा अजूनच धसका घेतला तेंव्हापासून.

आता काही वेळ गेल्यावर पुन्हा माझे ह्या गोष्टीकडे लक्ष गेले, तर आजुनबजूला पॉप कॉर्न चे वेड वाढलेच दिसले ह्या मधल्या वेळात. कदाचित तेवढ्या वेळात त्यांची ही ऑरगॅनिक पद्धतीने वाढ झालेली असावी. सोशल मीडिया मध्ये ऑर्गॅनिकली क्लीकस वाढतात तशीच. थिएटर एक्सपेन्स मध्ये एक महत्वाचा खर्च आता पॉप कॉर्न हा असावा, जो नक्कीच कमी नसतो.  'व्हॅल्यू फॉर मनी'  नक्कीच कमी. थिएटर किंवा मल्टिप्लेक्स च्या बाहेर तेच घेतले तर त्यांची किंमत १/५०० पट कमी असते. आणि तेच घरी केले तर १/१००० पॅट कमी (असे स्टॅटिस्टिकस आहेत). 

असो. आधीच  पॉप कॉर्न चे असंख्य लार्ज, एक्सट्रा लार्ज  आकारांचे बॉक्स बघून मी  त्रस्त समंध झाले होते, त्यात कधी कधी येतो तो त्यांचा सुंदरसा मिक्स वास, एअर कंडिशन मध्ये बंदिस्त असलेला. मग त्यात मसाला, चीज, मग चाट मसाला, बटर, पनीर इत्यादी. ही सगळी तारेवरची कसरत बघता बघता एक निसटता प्रश्न मनात आला, तो म्हणजे  पॉप कॉर्न टाइम आयेगा? या मुव्ही टाइम आयेगा? 

Saturday, June 15, 2019

अपना टाइम आयेगा

नुकत्याच केलेल्या ट्रिप मध्ये अपना टाइम आयेगा हे गाणे नीट ऐकले आणि डोक्यात पक्के बसले. गाण्याचा ताल, सरळसोट पणे एकाच सुरात म्हंटलेले रॅप , हळूहळू आवडायला लागले. गाण्यातला फोर्स जबरदस्त वाटला. रॅप सिंगिंग शी जरी मी तेवढी परिचित नसले तरीही अमेरिकन रेडिओ चॅनेल्स वर खूप दा रॅप ऐकले होते. कदाचित ही टर्म म्हणून तेवढी माहित नसेल. तर ह्या गाण्यातले अजून एक लक्षात राहण्यासारखे म्हणजे, त्याचे शब्द, जे बहुतेक सर्वच  रॅप गाण्यांमध्ये एकदम कट्यार काळजात घुसली असे असतात, राऊडी, बरेचसे टोकदार आणि तरीही अचूक आणि त्यातला भाव आणि सत्यपरिसथिती बेधडक समोर आणणारे.

कळत नकळत त्या गाण्याच्या डान्स पार्ट कडेही  वळले.मग लक्षात आले की ह्या गाण्यावर डान्स करायला ही बेफाम स्कॉप आहे, आणि तो कसाही असेल, पण त्यात एक नक्की असेल, तो म्हणजे त्यातला फोर्स, वाईल्डर्नेस .

करता करता गल्लीबोय मूव्ही ह्यात हे गाणे चित्रित केले आहे तो बघितला. खरं तर फक्त ह्या गाण्यासाठी. रणवीर सिंग बद्दल खास आत्त्मियता नसूनही मी हे धाडस केले. एका गाण्यासाठी मी खूप काही आउट ऑफ वे जाऊन कधीकधी मी असे काही करते आणि बऱ्याचदा काहीतरी नवीन मिळून जाते. अमेरिकेत असताताना माइल्स ऑफ स्काय ह्या एका सेल्टिक गाण्यासाठी मी अख्खी अनोळखी सी डी विकत घेतली होती. आणि असेच काही नवीन प्रयोग. तर 'अपना टाइम आयेगा' गाण्यासाठी साठी मूव्ही बघता बघता लक्षात आले की मला आधी वाटलेले तशी धारावी आणि काहीतरी व्हायोलन्स टाईप काहीच नव्हते, होते फक्त रॅप. आणि तेही रणवीर सिंग ने साकारलेल्या इंटेन्स रॅप सिंगर च्या स्वरूपात. एकदम साधा रोल आणि माझी त्याच्याबद्दलची आधीची बरीचशी गृहीतके मागे सारत सारत तो मला गल्लीबोय म्हणून एकदम आवडून गेला.

कितीतरी वेळा वाटते हे अपना टाइम आयेगा मधले लिरिकस खरेच आहेत. उठ जा अपनी राख से- बेचिराख धारावी जी आपल्याला विमानातूनच मुंबई त येताना धडधडत दिसते त्याबरोबरच येणाऱ्या कित्येक ग्रासरूट प्रश्नांशी  सामना करत, 'उड जा अब  तलाश  में'.  'अपना टाइम आयेगा'. 'जिंदा मेरा ख्वाब अब कैसा तू दफनयेगा।'
 . 
असे बरेच रोख टोक सवाल!!!

एक सेंट्रल थिम ह्यात आहे जी सर्वसामान्यांना कुठेतरी म्युसिक च्या माध्यमातून जवळ आणते ती म्हणजे एक आशा. एक उम्मीद, या कई सारी उम्मीदे जिनपर दुनिया कायम है . प्रत्येक क्षणाला एक आशा आहे म्हणून जिवंतपणा आहे. आखिर कर, अपना टाइम आयेगा!