जरुरत है जरुरत है... सख्त जरुरत है ..:) हे हिंदीत गाणे आठवत असेल तुम्हाला? त्यात त्या हिरो ला एका शिरीमती ची , कलावती ची गरज असते. आणि हो, 'सेवा करे जो पती की'ची ची पण. :) असते आपली आपली गरज एकेकाची. तुम्ही म्हणाल आता ह्याचा बॅगेशी काय संबंध? सरळ विषयावर का येत नाहीये ही? तर नाही मला आवडत सरळ विषयावर यायला कधी कधी. माझी मर्जी? :) असो, विनोदाला बाजूला राहूंदेत, ऊर्फ, jokes apart !
मी एका सुंदरशा बॅगेच्या शोधात होते. ती अशी असेल, ती तशी असेल, ती कशी असेल ? देखणी असेल का? कलावती असेल का ? सर्वगुणसंपन्न असेल का? उपयुक्त असेल का? टिकाऊ असेल का? हलकी फुलकी असेल का? हवेशीर असेल का? वगैरे कित्येक प्रश्न. माझी एकंदरीत प्रवासाची आवड, केलेले असंख्य प्रवास तेही वेगवेगळ्या माध्यमातून, कधी आवडीने कधी सवडीने, कधी घाईने तर कधी गर्दीने. कधी स्वदेशात तर कधी परदेशात आपले मानून राहताना ..केलेला प्रवास आणि त्यातल्या बॅगा .. आणि कधी नाईलाजाने करायला लागलेला प्रवास..
कित्येक वेळा परदेशात राहत असताना, जास्त करून US मध्ये, असंख्य बॅग वाहतुकीतून झालेली कधी कधी ची माझी बिकट अवस्था .. वीस वीस किलोच्या दोन मोठ्या मोठ्या बॅगा नेताना . त्यांच्याकडे हताश होऊन बघताना की आपल्याला हे सगळे वजन पेलवणार आहे का? कधी मोठे धिप्पाड पोर्टर्स, माझ्याकडे काम मागत असूनही त्यांच्याशी काय बोलायचे काम कसे सांगायचे माहित नसल्यामुळे झालेली अडचण. स्वतःच स्वतःच्या बॅगा वाहण्याचा केलेला अट्टाहास आणि त्या बॅगांमधून मांडलेला, नेलेला आणलेला संसार..म्हणजे अगदी शब्दशः नाही तर संसार म्हणजे सगळंच, त्याबरोबर निर्माण केलेला यत्र तत्र चा फाफट पसारा देखील..
ह्या सगळ्यातून मी खूप काही शिकले. एक महत्वाचे ते म्हणजे आपल्याकडे काहीही असो नसो, एक छान बॅग मात्र पाहिजे. :) आपले पुलं म्हणायचे 'माझे पौष्टिक जीवन', तर मला म्हणायचे आहे 'माझे बॅगी जीवन' आणि त्या भिंगातून आता बघत असताना मला दिसलेली, दिसत असलेली एक वेगळीच दुनिया.
तर नुकतीच मला माझी कलावती सापडली. :) जिच्या मी शोधात होते. जिसे ढुंढती हूँ मैं हर कही..करत करत..एक सुंदर ओशन ब्लू कलर. हलकी फुलकी. खूप कप्पे. व्हील्स मस्त. केबिन बॅग. expandable. म्हणजेच वाढीव जागा असेलेली. मी खूप खूष झाले. वाटलं हीच ती बॅग. हसीं हजारो भी हो खड़े मगर उसी पर नजर पड़े, तशीच. आणि एकदम झरझर करत वर्षामागून वर्षे गेली..
अनेक आठवणी बॅगांमध्ये दडलेल्या आठवल्या. कधी मी स्वतः भरलेल्या तर कधी माझ्या बरोबरच्या आप्तस्वकीयांनी, सहप्रवाशांनी भरलेल्या..असंख्य विमानाच्या बॅगेच्या पट्ट्या आठवल्या आणि त्यावरून सरकत सरकत जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवाशांच्या वेगवेगळ्या आकाराच्या, आणि रंगांच्या बॅगा आठवल्या.. त्यांची आतुरतेने वाट बघणारी माणसे आठवली. माणसे, जी कुठेतरी जाणारी कुठेतरी येणारी. कधी बॅग आली नाही विमानाच्या पट्ट्यावरून तर आपल्या जिवाभावाच्या माणसांएवढीच जवळीक साधणारी ही त्यांची बॅग.. आलीच नाही तर? कुठे गेली असेल? कशी असेल? कहां है तू? कैसी है तू? म्हणत म्हणत जीवाचे रान करणारी माणसं ही बघितली आहेत मी..
कधी घर गाठू बघणाऱ्या कदाचित प्रवाश्यांसारख्याच बॅगा ही असतील? दमलेल्या, भागलेल्या , आतुरलेल्या.. त्यांनाही त्यांची मनोगते असतील का? कधी शाळेत मनोगते लिहायला यायची. त्यात बॅग मात्र कधी नव्हती. असे मनोगत लिहायला आले असते तरी देखील जे अनुभवातून लिहिले जाते तेच खरे मनोगत नाही का? कदाचित हे विधान पूर्ण खरे नसेल ही. कधी काल्पनिक गोष्टीही खऱ्याच असतात. पण काहीही असो, आता माझ्या ह्या बॅग 'rewinding' मध्ये मला असंख्य गमती जमती, सुखे आणि दुःखे , हसू आणि आसू दिसायला लागली..
गम्मत म्हणजे बॅगा सुद्धा इतक्या विविध आकार आणि ऊकारांमध्ये येतात की बस्स. छोटी मोठी, केबिन चेक इन ह्याव आणि त्य्याव. काही रग्गेड काही नाजूक. काही लॅपटॉप साठीच्या तर काही अजून काही. काही corporate तर काही casual. काही भरमसाठ वस्तू राहतील अशा काही आटोपशीर. काही ना असे लॉक तर काहींना तसे लॉक. आजकाल अजून एक बॅग समूह निर्माण झाला आहे तो म्हणजे ट्रॅव्हल कंपनी केसरी वीणा SOTC इत्यादींच्या ब्रँड वाल्या बॅगा. म्हणजे कोणी वाटसरू चुकले माकले तर त्यांचा तपास करायला बरे. मग एकदा ती ट्रिप संपली तरी मग त्याच बॅगा इतस्ततः प्रवास करताना दिसतात त्याच आधीच्या तिकिटावर.. :) कित्येक वेळा तर अशा सारख्या सारख्या वाटणाऱ्या बॅगा बघून वाटायला लागतं की हे सगळे बॅगांचे देखील विश्वरूपदर्शन आहे की काय? सगळे सेम, तुम्ही आम्ही सगळेच. अहं ब्रम्हास्मि :) आणि मला ह्या सगळ्या अहं ब्रह्मास्मि तूनच बाहेर पडायचे होते. :) कृष्ण अर्जुनाला काय म्हणाला? तर तू तुझ्यासारखा वाग. स्वधर्म पाळ. तेंव्हाच तुला ह्या सगळ्या बॅगवतींमधून स्वतःची बॅग ओळखण्याचे सामर्थ्य मिळेल.
तर coming back to the airport. जरुरत है गाण्यामध्ये हिरो पुढचं म्हणतो, "तो साथ में आस्मा चले".. विमानतळ ही अशी जागा आहे तिथे बॅग ह्या entity ला अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे बॅगेलाही लागते जर एक्सट्रा वजन भरलं तर. सगळं गणित विमानाच्या thermodynamics वरती अवलंबून असतं. त्यात भावनांच्या भरात वाहवून नेण्यासारखं ही नसतं काही आणि तसं केलं तरी त्याला एक विशीष्ट किंमत मोजावी लागते. सिडनी विमानतळावर एका आजी आजोबांना अडवल्याचं ऐकलं होता सामान जास्त झालं म्हणून; तर त्यांनी तिथे विमानतळावर बसूनच बॅगेतले सगळे रवा बेसन लाडू संपवले म्हणे लाडूंना न्याय द्यायला. आपली मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्याच्याशी निगडित 'Law of Conservation of Energy' :) त्यांनी किती लाडू खाल्ले आणि त्यांच्या तब्येतीचे पुढे काय झाले ते कोणालाच पुढे कळले नाही. बॅग हलकी झाली एवढे मात्र निश्चित.

तर अशा संख्या बॅगा अडी अडचणीतून मार्ग काढत, कधी बेदरकारपणे भिरकावून दिल्या जात असतील, कधी काळजीपूर्वक हाताळल्या जात असतील, सगळे करत करत शेवटी दाटीवाटीने विमानाच्या सामानाच्या अवाढव्य कप्प्यात बसत असतील? कधी धास्तावून तर कधी निडरपणे?
ह्या सर्व rewinding मध्ये सगळ्यात धमाल प्रश्न म्हणजे खरोखरच प्रवासात सामान किती ठेवावे? माझा एक अमेरिकन colleague मला म्हणाला होता की 'there is nothing as beautiful as a little child packing a bag for a trip'. मलाही गम्मत वाटली एकदम. का असेल ? एक म्हणजे लहान मुलांना बॅग भरायला सांगितली की त्यांना वाटतं अक्खा आणि हवं ते सगळंच नेता येईल. मग ते ज्या पद्धतीने हव्या त्या वस्तू घेतील त्यात कदाचित आपलयाला म्हणजे मोठ्यांना महत्वाचं वाटेल च असे ही नाही पण ते जे काही घेतील ते फार निरागस असेल. मी स्वप्नामधून बाहेर आले.
माझी एक मैत्रीण वारी ला जायला म्हणून आली होती माझ्याकडे. आम्ही दोघी मग गेलो होतो. तिने माझ्याकडे येताना एका दिवसासाठी च पण एक खूप जड आणि मोठी भरलेली अशी बॅग आली होती.. मी आणि ती बोललो देखील ह्याबद्दल..हळूहळू बोलताना लक्षात आलं कि खरंच तिने आणलेलं सगळंच सामान तिला लागणारं होतं..आम्हाला कळत होतं आम्ही ज्ञानेश्वर तुकारामाच्या वारी ला जातोय तिथे जाताना रितं होऊन जायचंय किंवा रितं व्हायला जायचंय पण तरीही त्या आधी मात्र आम्हाला काही ना काही हवं होतं ...
ह्या सगळ्यात एक मात्र लक्षात आले बॅग म्हणजे एक 'limited space'. एवढेच नेऊ शकतो आपण. काहीतरी सोडून द्यावे लागते. काहीतरी 'drop' करावे लागते. काही तरी जड कमी करावे लागते. कारण ते पुढे जाऊन आपल्याला पेलवणार नसते. काहीतरी ठरवावे लागते. अनावश्यक काय आणि आवश्यक काय. काहीतरी तारतम्य बाळगावे लागते.. तरच आपण खरे प्रवासी होऊ शकतो.. light weight travelers..
वस्तूंच्या पलीकडे जाऊन कदाचित मला दवबिंदू pack करायला आवडतील. कदाचित गवताची थोडी पावसाने भिजलेली पाती देखील ठेवायला आवडतील. काही रानफुले कदाचित? कदाचित एखाद्या जाताना लागलेल्या देवळातले तीर्थ? भरधाव वेगाने जाणारा वारा? थोडा समुद्र ? थोडी त्याला कुठून कुठून काय काय करत येऊन मिळालेली नदी? थोडंसं चिमण्या पाखरांनी काड्या मुड्या जमवत जमवत बांधलेलं घरटं? थोडीशी वाळू? थोडेसे निसर्ग परतीच्या काहीही अपेक्षा न करता, आपल्याला जे काही अचाट अनुभवायला देतो, ते सगळे, त्यातले अनेकविध चमत्कार?
विचार करा तुम्हाला प्रवासाला निघायचे आहे, घरातले किंवा तिथे असाल तिथले सगळे सामान हवे आहे, सगळ्या खोल्यांमध्ये जड अवजड , बरेच काही .. तुम्हाला ५ मिनटं दिल्येत. काय काय पॅक कराल ह्या तुमच्या बॅगे मध्ये? जागा सीमित आहे. खरं तर वेळ ही सीमित आहे..

No comments:
Post a Comment