नुकतेच मला ट्रेन ने प्रवास करण्याचा योग आला. लोकल ट्रेन ने. प्रश्न असा होता कि एवढ्या असंख्य ट्रेनस ,मधून कोणती ट्रेन निवडावी. डोंबिवली फास्ट नावाचा तर पिच्चर पण आला होता. मला देखील coincidentally डोंबिवली लाच जायचे होते.
स्टेशन वर गेल्यावर खूप सारे प्लॅटफॉर्म्स. मग खूप साऱ्या ट्रेन लागलेल्या. मग त्याच्या शेकडो पट माणसं आजूबाजूला भरधाव वेगाने धावतायत. धावत नसतील तरी फास्ट तर नक्की चालतायत. माझी ट्रेन ची आवड खूप जणांना माहित आहे पण मला खरा लांबचा प्रवास जास्त आवडतो ट्रेन चा. तरी देखील प्रत्येक प्रवासामध्ये काहीतरी नवीन असते हेही नक्कीच.
आता ह्या ही गर्दीच्या झुंडीतून आज मला काय नवीन असणार आहे अनुभवायला हेही माझ्या मनात तोपयंत आले नव्हते, कारण मी भांभावून गेले होते. चॉईसेस इतके. कर्जत ट्रेन घेतली तर सुपर फास्ट, गर्दी ही फार, मोजक्याच ठिकाणी थांबणार आणि थेट मुक्कामाच्या ठिकाणी आपण लवकरात लवकर पोचणार. मग अजून इतर काही असेच वेग वेगळे काळ-काम-वेळ ह्यांचे गणित मांडणारे ऑपशन्स.
मग अचानक मला एक प्लॅटफॉर्म दिसला. भीड भाड घाई गर्दीच्या मधून थोडासा विसावलेला. तिकडे तसे जाणे येणे कमी होते. तिथे एक ट्रेन लागली होती. डोंबिवली स्लो. :)
मला लगेच चित्र क्लिअर झालं. मी काय करायचं, ते. छोटे छोटे निर्णय आणि छोटे छोटे बदल. पण कमालीचे ठरू शकतात कधी कधी.
मी सरळ डोंबिवली स्लो च्या प्लॅटफॉर्म कडे कूच केले. काय करायचे आहे सुपर फास्ट जाऊन. हल्ली ट्रेन्स देखील इंजिनीरिंग मधल्या टेकनॉलॉजि बदलांमुळे
मुळातच फास्ट झाल्या आहेत. पूर्वीपेक्षा . बरं मला काही कुठे जॉब रेलटेड वेळेत पोहचण्याचं देखील प्रेशर नव्हतं. नसतं. तरीदेखील एक मन सांगत होतं, फास्ट जाण्यात एक थ्रिल आहे .
पण असा विचार केला आहे का कि आपण कोणाला मागे टाकतोय? स्लो ट्रेन च्या स्टेशन्स ना! ते करून किती सा वेळ वाचणार आहे आणि एवढे करून एवढ्या गर्दीत का शिरावे आणि आपला सुंदरसा जीव मेताकुटीला आणावा. दिल है छोटासा! रमत गंमत थोडे जावे का? हा छोटासा चॉईस आपण करू शकतो का?
वाटलं, माझ्याकडे पुस्तक आहे एक छोटेसे वाचायला. मस्तपैकी बसायला मिळेल. थोडासा mentally unwind व्हायला मिळेल. आपण जाणीवपूर्वक फास्ट च्या जमान्यात स्लो आणि वळणाचा रस्ता निवडला ह्यातली गम्मत देखील अनुभवायला मिळेल.
मी शिरले स्लो ट्रेन मधले. आणि खरोखरच एकदम मजा यायला लागली. सगळी स्टेशन्स मी कुतूहलाने बघायला लागले. स्लो च तर ट्रेन आहे ना. मग काय. आस्वाद घेत जाऊ ? आजूबाजूची माणसे बघत ते कुठून आले असतील कुठे जात असतील असा विचार करत..मग कोणी शेजारी येऊन बसले गेले. फारशी भ्रांत नव्हती मला. मी आणि माझे पुस्तक, थोडासा वारा, प्रत्येक स्टेशनातली हलचल, आणि बाहेरचे जग बघणे. आता तुम्ही म्हणत ते जग सुंदरच होते का? नॉट नेसेसरीली. तरीही आपण जी लेन्स वेअर करू तसे आपल्याला दिसते. मग थोडासा रुमानी क्यों ना हो जाये?
थोडी स्लो ट्रेन पकडू. थोड्या स्लो गप्पा मारू.
म्हणजे फास्ट ट्रेन चे काय मग? वेल, ती तर आहेच. आपल्याला जिथे जिथे वेग लागतोच तिकडे आपण वेगानेच जायला हवे. मला फक्त हा विचार मांडायचा आहे की एखाद वेळी मुद्दाम, option असतानादेखील आपण स्लो ट्रेन पकडूयात का? मला तरी हा detour आवडला.
युअर थॉट्स?