सिम्बा मोठा झाला
आई ग, सिम्बा मोठा झाला..बघ सिम्बा मोठा झाला. बघता बघता..सिम्बा मोठा होतो. मी आणि माझी मुलगी 'लायन किंग' हा गाजलेला ऍनिमेशन चित्रपट बघता बघता मोठ्या झालो :) गम्मत म्हणजे सोफ्यावर बसून हा चित्रपट, हे गाणे, आमचे आवडते गाणे झाले..एकदम दिल से, टचिंग. ह्या गाण्याचे टायटल आहे, 'हकूना मटाटा'. आपला हा फ्युचर लायन किंग ऊर्फ सिम्बा एक सिंह असतो. आपल्या धर्माने. स्वधर्माने. पण तो लहानपणीच झालेल्या traumatic घटनांमधून वाचत वाचत तो एका अनोळखी प्रदेशात येतो. तेंव्हा तो लहान असतो. त्याला आपल्या स्वतःमधील पॉवर्स ची, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ही नसते, कोणी करून दिलेली ही नसते. त्याला दुनियादारी माहित नसते, युद्ध माहित नसते, राज्य माहित नसतं, सीमारेषा माहित नसतात. राज्य कसे करायचे, शत्रू कसे असतात, कटू कारस्थानं माहित नसतात, त्याच्या डोळ्यांमध्ये लुकलुकणारी निरागसता वॉल्ट डिस्ने (मूव्हिस ) ने अतिशय अचूकपणे टिपलेली आहे.
सिम्बा जेंव्हा आपल्या आई वडिलांपासून दुरावतो आणि ह्या अनोळखी प्रदेशात येतो तेंव्हा त्याला दोन जीवाभावाचे मित्र भेटतात. टिमॉन आणि पुम्बा. ते त्याला 'हकूना मटाटा' शिकवतात. त्याचा सांभाळ करतात. सिम्बा छोटा असतो. त्याला हे सगळे खूप छान वाटते. तो विचारतो मित्रांना 'हकूना मटाटा' म्हणजे काय? ते म्हणतात, "means no worries," "no trouble," or "take it easy". हा वाक्प्रचार मुळात स्वाहिली भाषेतला आहे. डिस्ने टीम ने ही टर्म पहिल्यांदा केनियात ऐकली, आणि मग ती एल्टन जॉन च्या ह्या गाण्याचा स्वरूपात जगभर पोचली. It signifies a carefree, problem-free philosophy. किती छान ना, लहान पण देगा देवा म्हणतात अगदी तसं, पण सिम्बा एक जातीचाच राजा असूनही त्याला माहीतच नसल्यामुळे तो ही आरामात असतो. आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवत रानावनात त्याला कशाचीच फिकर नसते.
असे इथे तिथे भटकंती करत करत सिम्बा आपला मनातल्या मनातलं carefree आयुष्य मनमुराद जगात असतो. ही सगळी कार्टून अथवा ऍनिमेशन characters आपल्याला इतका आपलंसं करतात की आपण त्याची स्टोरी जगायला लागतो. त्यांच्या शी आपला एक ऋणानुबंध जुळतो. आपणच आपल्याला त्या सिम्बा पुम्बा आणि टिमॉन मध्ये बघायला लागतो. कसे असते बुआ कॅरेफ्री आयुष्य? मला सिम्बा आवडत गेला आणि मी आणि माझी मुलगी असंख्य वेळा हे गाणे बघत बघा काहीतरी शिकत शिकत मोठ्या झालो. :) सगळ्यात गम्मत म्हणजे ह्या गाण्याच्या एका पॉईंट ला ब्रिज वरून जाताना सिम्बा छोट्याशा मोठा होतो. आधी जरा भाम्भावलेला जपून वागणारा, ह्या एका झाडाच्या खोडरूपी ब्रिज वरून चालता चालत एका स्टेप मध्ये मोठा होतो. आता हा सिनेमॅटिक अतिशयोक्ती अलंकार आहे आणि त्या वेळी माझी मुलगी दर वेळी गाणे बघताना म्हणत असे, अगं आई बघ. लुक. सिम्बा मोठा झाला.
हा मोठा झालेला सिम्बा आणि लहानपणचा सिम्बा ह्यात फरक आहे.. तो आता कॉन्फिडन्ट झाला आहे. सरावला आहे ..आजूबाजूच्या कंफेर्ट्स मध्ये. पुम्बा आणि टिमॉन च्या जंगलातल्या वातावरणामध्ये जिथे आक्रमक किंवा युद्धभूमी सारखे काहीच घडत नाहीये. ते खातायत तेच तो खातोय, ते जगतायत तसेच तो जगतोय, आनंदाने, त्यांची philosophy आत्मसात करून. एका सुंदर श्या निसर्गरम्य जंगलात. धबधब्यांच्या सान्निध्यात.
बघता बघता सिम्बा मोठा होतो पण तरीही मनाने तो अजूनही मस्तकलंदर आहे आणि असलाच पाहिजे. त्याचा रुबाब एक नवीनच आहे. मोठा झाल्याबद्दल अभिमान आहे त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या मित्र कम गार्डियन्स च्या चेहऱ्यावरही. आपण एका संकटातून सिम्बा ला वाचवला आहे, निरपेक्षपणे प्रेम करून त्याला माणसात आणलं आहे आणि त्याच्याबरोबर जगणं जगलं ही आहे.
But life happens. सिम्बा ला त्याची मैत्रीण भेटते. ती राज्यातली ख्याली खुशाली सांगते. सिम्बा चे आई बाबा देवाघरी घेल्यावर राज्यात मोठे अराजक माजले असते. अंदाधुंद आणि कोणीच करता राजा (किंवा राणी नाही). प्रजा दुखावली गेली आहे. दुष्काळ देखील पडला आहे आणि सगळ्याकन्हींचं सगळ्या प्रकारे वानवा..कोणीतरी हवं आहे तिथे म्हणजे तू, आणि शत्रूंची टोळी नाहीतर अजून नासधूस करेल. सिम्बा जागा होतो. त्याचे carefree life तिथे संपते. त्याला आपल्या आई बाबांची आठवत येते. त्यांची शिकवण आठवते. सिम्बा पुन्हा एकदा मोठा होतो!
मला असे वाटत राहते की माझी मुलगी तिला ही मूवी इतकी आवडली तिला ह्या सगळ्यात सिम्बा च्या मोठा होण्याचे आकर्षण होते. त्याचा ध्यास होता. त्याचा जन्म झाल्यापासूनची सेलेब्रेशन्स नंतरचा टत्याला मिळालेले प्रेम, आई वडील आणि प्रजादेखील..आणि मग हकूना मटाटा आणि मग त्याचा triumphantly राज्य वाचवण्याकडचा प्रवास, शत्रूशी लढणे, असे सगळे आणि मग पुन्हा नवा राजा होणे. आणि मला असा वाटतं की मला सिम्बा लहानपणचा जगण्यामध्ये जास्त कुतूहल होते. अर्थात नंतरच्या मोठे होण्यामध्ये ही होते. मी आणि माझी मुलगी ह्या गाण्यात मोठ्या होत गेलो.
मला नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून हातात की माझा सिम्बा आता मोठा झाला. माझी मुलगी जेंव्हा माझ्या हितासाठी माझ्या protection साठी माझ्या वतीने भांडली, माझ्या 'टोवॉर्ड्स' माझ्या सुरक्षिततेसाठी ..आणि म्हणाली..रडत..आई माझा जन्म तुला प्रोटेक्ट करायला झाला आहे तेंव्हा मला हसावं का रडावं कळलं नाही. रडलेच. आई मुलीचा नातं तसं आहेच क्लिष्ट. माझ्या मुळीतला सिम्बा खरा मोठा झाला असे मला वाटले.
अजूनही बरेच टप्पे येईल आपल्या आयुष्यात प्रसंग येतील जेंव्हा आपण असेच सिम्बा सारखे मोठे होत राहू. हो मीही. असे थोडीच आहे की आपण वयाने मोठे झालो म्हणजे मोठे व्हायचे थांबावे? त्याच कुतूहलाने जेंव्हा जेंव्हा आपण आपल्या स्वतःला 'conquer' करू, तेंव्हा तेंव्हा आपण मोठे होऊ. कसाही का असेना तो क्षण सोनेरी असतो. चंदेरी असतो. गुढी पाडव्याचा असतो. जेंव्हा आपणच आपली गुढी उभारतो, कधी सीमोल्लंघन करतो. कधी काहीच नाही करत. काहीच सेलेब्रेशन नसते पण तरीही सिम्बा 'privately' मोठा होत राहतो. Grow होत राहतो. प्रत्येक वेळी त्याला आधारस्तंभ देखील लागत राहातात. आणि त्याच वेळी मोठा होत असतानाच काही बदल त्यालाच प्रयत्न पूर्वक घडवून आणावे लागतात.
हकूना मटाटा!
No comments:
Post a Comment