काही गाणी आपल्या रोमारोमात किती भिनलेली असतातत ना? तसेच हे गुलझार चे 'आनेवाले पल जानेवाला है'. मूवी तर धमाल च होती -गोल माल. खरोखरच गोल माल आणि खूप सारे गोंधळ त्यातून निर्माण झालेले नाट्य त्यात अमोल पालेकर चा डबल रोल. तरीही मुव्ही कदाचित मी परत परत बघणार नाही, हे गाणे मात्र परत परत ऐकेन त्यातल्या अर्थावर विचार करेन, आणि तसेच जगायचं देखील कदाचित प्रयत्न ही करेन.
त्यातलीच एक लाईन. एक बार वक्त से लम्हा गिरा कही... वहा दास्तान मिली .. ह्यातले अतिशय सुंदर मर्म म्हणजे, वक्त आणि लम्हा ह्यातला मेळ. वक्त म्हणजे अनादी अनंत असा 'मैं समय हुन'. महाभारतातला धीरगंभीर आवाज.. सिरीयल सुरूच ह्या वाक्याने व्हायची. म्हणजेच मॅथेमॅटिकस च्या भाषेत इंफायनाईट टाइमलाईन. जिला सुरवात नाही जिला शेवट नाही. नाव आहे चाललेली काल ही अन आज ही..
हा सगळं वक्त चा स्पॅन ..त्यातनं एक लम्हा म्हणजे नक्की काय ? तर एक छोटासा बिंदू.. तोच लमहा जेंव्हा टाइमलाईन पासून निखळून पडतो.. तेंव्हा मागे वळून माघितलं त्या जागी काय मिळतं? तर लम्हा काही नही. तिकडे फक्त एक दास्तां उर्फ कहानी, एक वर्णन मिळतं ..एक स्टोरी मिळते.. आपल्याला हवी तशी बनवलेली. पण ती तो मोमेन्ट म्हणून कधीच परत येत नाही. चांगला असो वा वाईट वा त्यातला मधलाच काहीतरी. neutral.
पण मग सगळं खेळ हा 'पल दो पल' का आहे .. आनेवाला पल..भी.. जानेवाला है.. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो ...पल ये जो जानेवाला है.. तेही गुलझार म्हणतोय की हो साके तो..पण का आग्रह धरत नाहीये? कारण अट्टाहास केला तरी तो लम्हा अजून निसटून जाऊ शकतो.. दास्तां बनत बनत..
मग त्या एका छोट्याशा इवल्याशा क्षणांमध्ये आपण आपल्याला झोकून देऊ शकतो का? हो सके तो?
No comments:
Post a Comment