कोणाच्याही स्वयंपाकघरात घुसून एखादी गोष्ट शोधणे किंवा त्याही पलीकडे जाऊन एखादी गोष्ट किंवा आयटम बनवणे ही एक अत्यंत कठीण कला आहे असे मला वाटते. शिवाय अत्यंत आत्मविश्वास ही लागतो त्याला. जो माझ्यात नाही आहे असे म्हंटले तरी चालेल अथवा मला माझा आत्मविश्वास इतर जागी वापरायला जास्त आवडतो. उदाहरणार्थ कामात.
ह्याचा अर्थ मला कोणाच्या ही किचन मध्ये जायला जमतच नाही असे नाही पण गम्मत अशी आहे की, उदाहरणार्थ माझी आई फ्रिज टॉप टू बॉटम नियोजित करत असेल तर मी बॉटम टु टॉप. मी जर भाज्या फ्रिज च्या खालच्या कप्प्यात ठेवत असें तर आई वरच्या. मी जर गोष्टी झाकून ठेवत असें फ्रिज मध्ये तर आई उघडे. कोणी चमचे उलटे ठेवत असेल तर कोणी सुलटे.
सगळ्यात जास्त धाडसी गोष्ट म्हणजे कोणाच्याही फोडणीच्या भांडत बघणे. (including mine). कोणाचे फोडणीचे भांडे गबाळे तर कोणाचे अजून गबाळे. कोणाचे कमीत कमी लेव्हल ला सगळे मसाले आलेले तर कोणी ओतप्रोत भरून एकमेकांच्या लाईन ऑफ कंट्रोल मध्ये घुसणारे.
एक ना धड भराभर चिंध्या. तर अशा विविध पद्धतीने नटलेली असंख्य किचन्स. मग तुम्ही म्हणाल कि कशाला वेळ येत्ये असे अचानक किचन मध्ये जाऊन कोणाकडेही धुंडाळायला? हल्ली तसे बघितले तर कमी च येते अशी वेळ पण तरीही जेंव्हा येते तेंव्हा मी बघितले आहे कि काही जण किचन फिगर आउटिंग गरुडासारखे फार कमी वेळात आणि शिताफीने करू शकतात तरी काही जण स्लॉथ असतात.
मग तुम्हाला काय व्हायचंय? पूल देशपांडेंना सारखा एक प्रश्न विचारते. स्लॉथ का इगल? :)
No comments:
Post a Comment