हे काय? बर्ट्रांड रसेल म्युसेली ? बर्ट्रांड रसेल हा तर ब्रिटिश फिलॉसॉफर होऊन गेला ना ? मग त्याचा म्युसेली शी काय संबंध? संबंध असा की बर्षर आणि बर्ट्रांड ह्यांच्या उच्चरातले साम्य. खरं तर ह्या रेसिपी चे नाव आहे बर्षर म्युसेली! माझी अतिशय आवडती ब्रेकफास्ट डिश. पहिल्यांदा मी आणि माझा नवरा आम्ही ऑस्ट्रेलिया त असताना खाल्ली. मस्त बनवली होती त्या होमस्टे च्या ओनर ने. त्यानंतर असेच कित्येक वर्ष कुठे काही ट्रॅव्हल असेल तर ही डिश मी आवर्जून घेत असे हॉटेल मधल्या ब्रेकफास्ट मध्ये. म्हणजे अगदी उडी मारून घेत असेल असं म्हंटलं तरी चालेल.
माझे खाद्यपदार्थांमधले रिव्हर्स इंजिनीरिंग तेंव्हा एवढे जागरूक नव्हते. म्हणजे मी फार विचार करत नसे, खायला मिळालं आहे ना, त्याची कृतज्ञता व्यक्त करून मी खात असे. म्हणजे बेताने च हं, हावरटासारखे नाही, पण मन लावून वगैरे.
कमिंग बॅक तो म्युसेली, एकतर नावच एवढे कठीण आहे उच्चारायला. त्यात बर्षर म्युसेली. आपली मराठी नावे बघा, उपमा, पोहे. छोटे छोटे साधे शब्द. हे बर्ट्रांड रसेल सारख्या तज्ज्ञ लोकांमुळे किंवा बर्षर म्युसेली सारखी कठीण कठीण नावे ठेवणाऱ्या अज्ञात माणसांमुळे सोप्या गोष्टी कठीण होतात. नाही का?
पण मी ठरवलं बर्षर म्युसेली बनवायचीच, जेंव्हा माझ्या नुकत्याच केलेल्या बोर्निओ ट्रिप मध्ये मला खूप ठिकाणी ही डिश खायला मिळाली. एक नवीन मत्रीण झाली ट्रिप मध्ये, ती म्हणाली मी ही रोज करते. मी भितीयुक्त आदराने तिच्याकडे बघितले. ती म्हणाली ही 'नॉन-कूकिंग' रेसिपी आहे. मला अजूनच गोंधळायला झाले. म्हंटलं सांग पुढे. व्हर्जिन अँपल ज्युस घायचा, रोल्ड ओट्स घ्यायचे मग ते रात्री १० तास अँपल ज्युस मध्ये भिजवायचे मग त्यात योगर्ट, वगैरे वगैरे... मला चक्कर यायला लागली. एक एक त्यातला इन्ग्रेडियंट खास कुठून कुठून आणायचा होता. साधा सुद्धा नव्हता. मग मीही ठरवले, बीइंग डाय हार्ड ऑप्टिमिस्ट, आता मी माघार घेऊच शकत नाही. बर्ट्रांड रसेल म्युसेली बनवायचीच. कितीही कठीण असली तरी.
मग जंग जंग पछाडत, मग रोलिंग स्टोन सारखे गोल उड्या मारत म्हंटले तरी चालेल, कोणी रोल्ड ओट्स देता का रोल्ड ओट्स असे विचारात दुकानं च्या दुकानं फिरले. काही दुकानदार तर माझ्याकडे कोहिनूर हिरा आहे का विचारल्या सारख्या अविर्भावात बघत आश्चर्यचकित झालेले दिसले. मग काहींनी नॉन रोल्ड ओट्स दिले. जे मी नाकारले. मग finally होकारले सुद्धा कारण म्हणजे बघुयात तरी. तेही गणित चुकले. मग एका शुभ मुहूर्तावर मला रोल्ड ओट्स मिळाले. भिजवलं एकदाचं त्यांना. मधल्या वेळात मग व्हर्जिन अँपल ज्युस शोधला. तोही कठीणच होता मिळायला. :) मग तिने मला सांगितले बॉक्स वर काय बघायचे मग ऑथेंटिक व्हर्जिन अँपल ज्युस मिळतो. तोपर्यंत मग कसे बसे एक्सपायरी डेट न गेलेले योगर्ट मिळवले. असे करत करत मी ही जे के रोलिंग सारखी हॅरी पोट्टर ची लेखिका ऑलमोस्ट झाले. जे के रोलिंग सारखेच माझ्याकडेही कॉन्ट्रॅक्ट नव्हते तेंव्हा हातात. :)
आता फक्त राहिले ते एक शेवटचे काम ते म्हणजे हे सगळे नीट पणे मिक्स करणे. त्यात खजूर आणि काही फळे तुकडे करून घातले. . जमली बाबा एकदाची- बर्षर म्युसेली. आयुष्याबद्दल खूप काही शिकवून गेली मला ही रेसिपी. :) हुश्श्य . पण आतापर्यंत माझ्यातली मिनिमलिस्ट आता जागी झाली होती. इनफ इस इनफ.
हीच रेसिपी आपण सोपी करू शकतो का? मग मी धडाधड त्यातले सोप्पे मार्ग शोधले, बाहेरून गोष्टी न आणता घरच्या घरी आपण कसे सगळे बनवू शकतो, तीच टेस्ट आणून? सगळे आत्मसात केले मग मला finally चांगली झोप लागली. शिवाय रोल्ड ओट्स १० तास भिजवून ठेवावे लागत नाही ह्याचा ही मूलभूत रिसर्च मी केला. त्याचा soaking time ३० मिनिटांवर आणून मी प्रोसेस ऑप्टिमाइझ सुद्धा केली. :) मी आता होममेड बर्षर म्युसेली एक्स्पर्ट झाले आहे. झोपेतही पेपर घाला. मी पास होईन. :) आणि हो बर्ट्रांड रसेल फिलॉसफया सारखी ती कठीण राहिली नाही, नाऊ आय प्रौडली से आय कॅन मेक बर्षर म्युसेली :)
No comments:
Post a Comment