सुरवातीला कितीतरी वेळ माझा असा समज होता की 'त्या फुलांच्या गंधकोशी' हे गाणे प्रियकर प्रेयसी ह्यांच्यातील आहे, नंतर समजले कि हे देवाला उद्देशून लिहिले आहे. अर्थात कवी किंवा लेखक जे लिहितो त्यातून वाचक आपला हवा तो अर्थ नक्कीच काढू शकतात आणि तीच तर गम्मत आहे. निसर्ग हाच देवाच्या जागी मानला आणि सृष्टीतील विविध रुपे देवाचीच वेगवेगळी रूपे मानली तर मग वेगळे खास देवळात जायलाच नको ..?
असो, माझ्यासाठी valley of flowers हा असा एक अनुभव होता ज्यात मी निसर्गाच्या आणि माझ्या मनातल्या देवाच्या खूप जवळ गेले आणि नवीन होऊन परत आले. माझ्या office मधला एक सहकारी आणि मित्र हिमाचल प्रदेशात पाला-बडा होता आणि तो एक दिवस ह्या जागेबद्दल सांगत होता, फोटो सुद्धा होते त्याच्याकडे आणि मी ठरवला कि तिथे जायचेच एकदा. आणि खरोखरच जायचा योग आला. तिथल्या ट्रेक बद्दल जरा घबराहट होती थोडी- पोचेपर्यंतच जीव मुठीत असतो वगैरे वगैरे..ऐकलेले बोललेले. बर्याच चुकीच्या कल्पना ही होत्या..वाटलेले कि अशा जागी ट्रेक करणारा म्हणजे जास्त करून तरुण वर्गच असेल - ट्रेक ग्रुप मध्ये (आपल्यासारखा) . तरुण वर्ग नक्कीच होता जास्त करून, पण मनाने. जवळजवळ पन्नाशीच्या आसपासचे कित्येक हौशी base-camp var, आणि गम्मत म्हणजे ३० जणांपैकी ५ वयाने तरुण आणि उरलेले चिरतरुण...आणि हो त्यातलीच एक म्हणजे माझी सहप्रवासी - माझी एक सत्तर वर्षीय आजी. मला आणि माझ्या मावसभावाला बरोबर 'सोबत' म्हणून आलेली आणि सर्वात 'तरुण' . :-)
पुढे ह्या trip बद्दल बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण आता वयाप्रमाणे memory chips साथ देत नाहीत ..हा हा हा, ११ वर्ष होऊन गेली ना ह्या 'त्या फुलांना'. एक मात्र नक्की की तिथला तो निसर्ग, हिमालयाचा अथांग पणा, मोठ्ठे च्या मोठे खुले आकाश, अलकनंदा आणि अशा अनेक भगिनी नद्या त्यांचे एकत्र येणे लांब जाणे अजूनही अगदी डोळ्यांसमोर आहे..आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या trip मधला तरुणपणा, जो माझ्या 'तरुणपणापर्यन्त' मला साथ देईल...
changale lihalyas..ashich lihiti raha :)
ReplyDeletechhaaan lihilays vatat nahi itki varshe zhali... - kunda aaji....
ReplyDeleteThanks all for taking time in reading this one. Kunda aaji is right- vatat nahi itki varsha zali te..
ReplyDelete