Thursday, February 21, 2013

जाईन विचारित रानफुला

रानफुलांबद्दल मला एक खास जिव्हाळा वाटत राहिला आहे, असेच एखाद्या लांबच्या लांब ट्रेक ला जाताना एखादे मोठ्ठे हिरवेगार पठार लागते, त्यावरून आपण अगदी भुरभुरणाऱ्या पावसात चालत राहतो, agendaless, आणि वाटेत कडेला अगदी छोटी छोटी शी अशी ही सहज कदाचित दुर्लक्षित होऊ शकतील अशी साधी सुधी फुले असतात, पांढरी शुभ्र . पण त्यांच्याकडे एकदा लक्ष गेले कि ती एकदम मन टवटवीत करून टाकतात. मस्त बिनधास्त आकाशाकडे बघत डोलत असतात आणि त्यांच्याकडे कोणी बघो वा न बघो, आपल्या आपल्या धुंद्दीत असतात..आणि हो अगदी सर्व हिरवेगार असते तेंव्हाच ही अशी असतात असे नाही, एखाद्या माळरानात सुधा ती अशीच खुलून असतात...एखाद्या उन्हा तान्ह्याच्या दिवशीही ती अशीच दिसतात,  मग अशा वेळी त्यांना बरेच काही विचारत जावेसे वाटते..त्यांच्याशी हितगुज साधावेसे वाटते..विचारावेसे वाटते, काय शिकता तुम्ही दररोज, काय गोष्टी तुमचा एखाद्या गोष्टीकडे  बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मकरित्या बदलतात? काय गोष्टी तुमची प्रतिभा आणि प्रतिमा साकारतात? असे बरेच काही..मग मग लक्षात येते कि आपल्या प्रत्येकाच्या मनातदेखील अशी अनेक रानफुले दडलेली असतात..आणि आपण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्येही. गोष्ट सोप्पीच असते, पण दुर्लक्षित असते कधीतरी, अशाच बर्याच उन पावसातीत रानफुलांच्या गोष्टी /घटना सांगण्यासाठी हा blog सुरु करण्याचा एक प्रयत्न.  

3 comments:

  1. प्रिय स्वाती,
    रानफुलांनी तुझी बाग सदैव बहरलेली असावी, या शुभेच्छेसह
    अश्विनी

    ReplyDelete
  2. स्वाती
    मला नेहमीच असं वाटत कि तू एकदम मनातलं लिहितेस . सहज सोप्पं आणि उत्स्फूर्त .
    वा ! मस्तच .

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Aditee and Ashwinee. Hope you will find little time in reading my posts and getting a bit refreshed once in a while :-)

      Delete