एकदा असेच गम्मत म्हणून चिमण्यांची नक्कल केली, हेबेहूब त्यांचा आवाज जमला असावा. माझी मुलगी खूप खूष झाली माझ्या नकलेवर, आणि अचानक आजूबाजूच्या झाडांमधून चिमण्यांचा अदृश्य घोळका माझा प्रतिध्वनी बनला..कुठे होत्या ह्या सर्व चिमण्या नक्की माहित नाही, पण आजूबाजूला बरीच झाडे आहेत जुनी आणि मोठी त्यातच कुठेतरी दडल्या असाव्यात ...अगदी अनपेक्षितपणे माझ्या चिमण्यांना म्हणून न दिलेल्या सादेला खुद्द चिमण्यांकडून प्रतिसाद मिळाल्यावर मी ही भन्नाट खुश झाले. माझी मुलगी जरा गडबडली कि हा दुसरा आवाज कसा काय आणि कुठून आला..मग एकाच खेळ चालू झाला. माझी त्यांना मारलेली हाक आणि त्यांच्या प्रतिसाद. एक एक करत एक नैसर्गिक resonance निर्माण झाला आसमंतात आणि मी त्याच्यात हरखून गेले. आजूबाजूचे सगळेही हा खेळ enjoy करायला लागले. मग लक्षात आले कि ह्या चिमण्या ही एका सादेची वाटच बघत होत्या की, आणि ती मिळाल्यावर मोकाट सुटल्या mad सारख्या :-) शेवटी म्हणावे लागले- ह्या चिमण्यांनो परत फिरा रे..
No comments:
Post a Comment