माइनस्वीपर्स हा माझा पहिला आवडलेला कॉम्पुटर गेम. कॉम्पुटर इंजिनीरिंग च्या दिवसांत हा गेम नुकताच आला असावा. फारसे गेमिंग मध्ये नसूनही तेंव्हा खूप धमाल यायची हा गेम खेळताना मला, समुद्रात पाठवल्या जाणाऱ्या माइनस्वीपर्स सारखेच काहीतरी लपलेले बॉम्ब्स डिटेक्ट व्हायचे आणि ते जेवढे टाळता येतील आणि ते करत करत बोर्ड क्लिअर करता येईल टिकते जास्त पॉईंट्स मिळत जातात.
अर्थात खूप वर्षात हा गेम खेळणे मागे पडले, काळ काम आणि वेग ह्याची गणिते सोडवता सोडवता एक फेवरीट खेळ मागे पडला. आता अचानक का आठवला हा खेळ तर प्रत्यक्षातच अचानक लिफ्ट मध्ये नुकतेच "hidden mines " चा स्फोट झाला. कारण तसे वरवरचे आणि साधेच होते.
मी स्वराला घेऊन मी नेहेमीप्रमाणेच घाईघाईत लिफ्ट मधून चालले होते, शाळेत बससाठी सोडायला. उशीर. अचानक एक मैत्रीण भेटली, तशी खूप ओळख नाही पण तरीही मैत्रीण. काहीतरी लहान मुलांवरून संवाद सुरु झाला आणि ही मैत्रीण माता एकदम जबरदस्त भडकलीच. मीही घाबरून गेले. म्हंटले, काय झाले? म्हणाली काल रात्री मी मुलीवर (हिची मुलगी सहावीत आहे) प्रचंड जोरात ओरडले आणि एकदम तिने विचारले आवाज ऐकू आला का? मी म्हंटले नाही. मग म्हणाली वर्क-लाईफ बॅलन्स खूप कठीण होतोय, मुलगी अभ्यासचं करत नाही आणि हे असेच चालत राहिले तर मी तिला सांगितले आहे कि वर्ष रिपीट करावे लागेल. एकदम आग पाखडत होती आणि आश्चर्य म्हणजे एक रात्र निघून सरूनही तिच्याकडच्या mines एकदम "activated " होत्या. राग, frustrations , तळमळ , काळ काम वेग ह्यांचे ना जमणारे गणित (ती डॉक्टर आहे) आणि एकंदरीतच बहुतेक बरेच काही, एखाद्या "tip of an iceberg" सारखेच. स्वरा नेहेमीप्रमाणेच थोडीशी टरकलेली , आता तिच्या मैत्रिणीचे काय होणार ह्या कल्पनाने आणि कदाचित तिचेही काय होणार ह्या कल्पनेनेही .
हे सर्व minesweeping लिफ्ट मधल्या ३ मिनटात. मला जे काही सुचले त्याप्रमाणे मी तिला थोडेसे शांत केले. पण तरीही तिला अख्खा "बोर्ड क्लिअर" करायला वेळ लागेल अशी चिन्ह दिसली. मी स्वराकडे बघून हसले, तीही मस्त हसली, मलाही माझे treasure सापडले आणि आम्ही मात्र दिवस एक आनंदी नोट वर चालू केला.
खैर, स्ट्रेस ला एक अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे कधीकधी. कधीतरी असे स्फोटक बनणे कदाचित चालेल ही. बऱ्याचदा ते जस्टिफाईड . पण तरीही सतत अशा स्फोटक किंवा माईनस्वीपर्स मध्ये राहणे आणि मार्ग क्लिअर करणे नक्कीच छान नाही.
एक छान साधे आनंददायी आयुष्य अपेक्षित आहे. ह्यात थोड्याफार mines , पण जास्तीत जास्त threasures असतील. गेम क्षणाक्षणाला स्फोटक नसेल, तर बुद्धिबळासारखा आपल्या बुद्धीची जास्तीत जास्त कुवत आजमावून पाहणारा असेल, आपल्याच betterment साठी , किंवा एखाद्या कॅरम बोर्ड सारखा असेल, सोंगटी घेता आली तरी छान, नाही गेली तरी स्फोट तरी होऊ देत नाही आपण तिथे. किंवा river - rafting सारखा असेल ज्यात आखा गेम निसर्ग च्या अफाट सामर्थ्याकडे झुकून त्याप्रमाणे पुढे सरत जाणारा असेल. आपला गेम आपण ठरवायचा.

No comments:
Post a Comment