नुकतीच एक स्वरा च्या आधीच्या शाळेत शिकवणारी टीचर भेटली. नेहेमीचेच हाय हॅलो झाले. मग म्हणाली स्वरा ला तुम्ही स्पोर्ट्स ला नाही का घातले. मी विचारला कुठचा स्पोर्टस , शाळेत तर कंपलसरी आहेच स्पोर्ट्स फिटनेस ऍक्टिव्हिटी , एक नाही तर तीन आहेत. मग म्हणाली ते तर आहेच, पण अजून एक्सट्रा खेळ. मी मनातल्या मनात म्हंटलं इथे आहे तेच होत नाहीये, मुळात मनुष्यबळ कमीच:-) शिवाय एक्सट्रा मुळात लागणारच आहे कशाला? असो, मी विचारला की कुठे नेतेस तुझ्या मुलाला? मग तिने इथे काही किलोमीटर अंतरावरच्या एका स्पोर्ट्स अकॅडेमि चे नाव सांगितले. मी म्हंटलं मस्तच. स्वरा लाही मी न्यायचे तिथे पूर्वी. मग म्हणाली एखादे अजून एक राखीव स्पोर्ट्स हवेच तिला, शाळेतल्या शिवाय. म्हंटलं हे सगळं शाळेतून दमून भागून मुलं आल्यावर? ते पण दोन दोन तीन तीन स्पोर्ट्स आक्टिविटी आधीच पार पडून आल्यावर? मग म्हंटलं गुड ऑन यू . :-)
पण हिच्या एक्सट्रा आक्टिविटी काही संपेनात. शाळा सोडून एकदन्तरित बरेच काही करते ही. मग म्हणाली जर तुला अभ्यासासाठी ट्युशन लावायची असेल तर अतिशय खात्रीलायक private शिक्षिका आहे तिच्या ओळखीची. माझा पुन्हा प्रश्न, एवढ्या लहान पोरांचा काय तो अभ्यास आणि त्याला ट्युशन? अर्थात लागत असेल गरज. मी नाही म्हणत नाही. पण ह्या सगळ्याचा अतिरेक वाटतोय मला, अजून थोडा एक्सट्रा, अजून तिकडून डबल एक्सट्रा , मग अजून कुठून तरी ट्रिपल समाधी आणि मग हे सर्व सोपस्कार पार पडले, की मग एक्सट्रा चॉकोलेट किंवा चीझ . मग स्पोर्ट्स मध्ये मिळवलेला फिटनेस आणि कमावलेली तब्येत पुन्हा घटवणे आणि पुन्हा तेच वर्तुळ.
हां आणि अजून एक जाताजाता, ती म्हणाली, बरा का स्वरा, फक्त ए प्लस च मिळवायचा हा का शाळेत. :-) मग च मी घरी party ला बोलावेन . म्हणजे थोडक्यात सगळीच आय पी एल, भेळ आणि खिचडी. And then of course this conditional friendship, हा हा .
मी असे अजीबात म्हणत नाहीये की एक्सट्रा गोष्टी करू नयेत. Excellence is my persuit too. पण असा सगळंच ट्रिपल X एक्सट्रा एक्सट्रा करता करता आपण साधासुधा ल सा वि पण काढायला विसरलो तर मुश्किल आहे. काळ काम वेग ह्याचे गणित साधेच आहे तसे. त्यात प्रत्येकाकडे असलेले मनुष्यबळ. ह्यांची सांगड घातली तर कदाचित आपल्याला गणितं अजून थोडी चांगली सोडवता येतील. नाही का?
No comments:
Post a Comment